बॉलीवुडमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. कुणाचं नशिब चमकेल, कुणी रातोरात स्टार बनेल किंवा कुणी क्षणात खाली आपटेल हे सांगणं अशक्य आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या बड्या कलाकारांना सारेच ओळखतात. त्यांचे सिनेमा, त्यांची भूमिका प्रत्येक फॅनला माहिती असते. आता अभिनेत्री ट्विंकल खन्नाही याच कारणामुळे चर्चेत आली आहे. 'मेला' सिनेमा आजही रसिकांच्या चांगलाच लक्षात आहे. मात्र याच सिनेमानंतर ट्विंकल खन्नाचे करिअर बरबाद झाल्याचे तिने स्वतः खुलासा केला आहे. ट्विंकलची सा-यांनीच रुपेरी पडद्यावर झलक पाहिली आहे.मात्र मेला सिनेमानंतर ट्विंकलचे फिल्मी करिअर पूर्णपण फ्लॉप झाले. त्यामुळे बॉलिवूडपासून दूर जात ती संसारात रमली.
नुकतेच ट्विंकलने इन्स्टाग्रामवर महामार्गावर जाणा-या ट्रकचा फोटो शेअर केला आहे, ज्यात 'मेला' सिनेमाचे पोस्टर दिसत आहे. या सिनेमामध्ये ट्विंकल खन्नासह आमिर खानची भूमिका होती. मात्र, या पोस्टरमध्ये मुख्य नायक आमिर खान दिसत नाही तर ‘मेला’ सिनेमाचा व्हिलन टीनू वर्माचा चेहरा दिसत आहे. फोटो शेअर करत ट्विंकलने लिहीले की, 'माझा विश्वास आहे की काही गोष्टी या टाइमलेस असतात. आज माझ्या मेसेज वर आला. या व्यतिरिक्त मी काय सांगू, माझ्यावर आणि देशातील इतरांवर नक्कीच डाग पडला आहे, तुम्हाला ते कसे पहायचे आहे ते तुमच्यावर आहे.
ट्विंकल खन्नाने यापूर्वीही 'मेला सिनेमाची खिल्ली उडवली होती. करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण' मध्ये ट्विंकल म्हणाली होती की, आजही रसिकांना 'मेला' सिनेमा माझ्या अभिनयामुळे आठवतो, तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. 'मेला' हा सिनेमा 20 वर्षांपूर्वी 2000 मध्ये रिलीज झाला होता, ज्यामध्ये आमिर खानचा भाऊ फैजल खान देखील दिसला होता.
चूक नडली! मेरे पेट पर लात मत मारो...म्हणत अक्षय कुमारने मागितली बायकोची हात जोडून माफी
नुकतेच 'पॅडमॅन' या सिनेमाला दोन वर्षे पूर्ण झालीत. ज्या मुद्यावर लोक बोलायला कचरतात, त्याच मुद्यावर आम्ही एक सिनेमा बनवला, याचा मला आनंद आहे. मला आशा आहे की, गरीबी आणि मासिक पाळीसंदर्भातील कालबाह्य विचार आपण समूळ नष्ट करू शकू,’ असे अक्षयने आपल्या या ट्विटमध्ये लिहिले. या ट्विटमध्ये त्याने सोनम कपूर आणि राधिका आपटेला टॅग केले. मात्र ही पोस्ट करताना अक्षय बायकोला विसरला. पण बायकोने त्याची ही चूक नेमकी हेरली. मग काय, तिने ट्विटरवरच नाराजी व्यक्त केली, तेव्हा कुठे अक्षयला जाग आली. अक्षय काय विसरल. तर ‘पॅडमॅन’ संदर्भातील ट्विटमध्ये ट्विंकलचे नाव. होय, कारण ट्विंकल ही ‘पॅडमॅन’ची प्रोड्युसर होती.