बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाच्या (Twinkle Khanna) सोशल मीडिया पोस्ट फारच इंटरेस्टिंग असतात. कधी विविध मुद्यावरचं तिचं परखड अन् बिनधास्त मत, कधी स्वत:च स्वत:ची उडवलेली खिल्ली यामुळे तिच्या पोस्ट क्षणात व्हायरल होतात. सध्या तिच्या ताज्या पोस्टची चर्चा आहे. होय, या पोस्टमध्ये तिने तिच्या एका ‘आजारा’बद्दल सांगितलं आहे.
ट्विंकलने या पोस्टमध्ये एक फोटो शेअर केला आहे. यात ती इंचटेपने मदतीने काहीतरी मोजत असल्याचं दिसतेय. फोटोत फार विशेष नाही. पण फोटोला तिने दिलेलं कॅप्शन यातच बातमी आहे.
‘दोनवेळ माप घ्या आणि एकदा कापा... लिखाण करताना मी हेच करते. बोलतानाही हे करावं, अशी माझी इच्छा असते. पण विचार न करता बोलण्याच्या आजारामुळे मला अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो आणि हे खूपच लज्जास्पद आहे,’असं ट्विंकलने पोस्टमध्ये लिहिलं आहे. शिवाय फूट इन द माऊथ या गंभीर आजाराशी संबंधित तुमचे वाईट अनुभव कमेंट्समध्ये सांगा, असं आवाहन तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. आता ‘फूट इन द माऊथ’ हा काय प्रकार आहे तर हा कुठलाही आजार नाही. अनेकांदा विचार न करता बोलण्याची सवय असते आणि यामुळे अनेकदा अशा लोकांना समस्यांचा सामना करावा लागतो, ट्विंकलने नेमक्या याच तिच्या सवयीबद्दल सांगितलं आहे.
ट्विंकल परखडपणासाठी ओळखली जाते. यामुळे अनेकदा ती ट्रोलही झाली आहे. तुम्हाला आठवत असेलच की, अक्षय कुमारने लोकसभा निवडणुकीआधी नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली, तेव्हा खुद्द मोदींनीही ट्विंकलच्या सोशल मीडिया पोस्टचा उल्लेख केला होता.
तूर्तास ट्विंकलच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. ‘ बोलण्यापूर्वी विचार न करण्याच्या तुझ्या या आजाराचा आम्हाला काहीच प्राब्लेम नाही किंवा त्रास होत नाही, तेव्हा काळजी करू नकोस,’ असं एका युजरने म्हटलं आहे. तुझी ही सवय अशीच सुरू ठेव...आम्ही सुधारणार नाही, जसं आहे तसं.. तेव्हर काळजी करू नकोस...अशी कमेंट एका चाहत्याने तिच्या या पोस्टवर केली आहे.