Join us

ट्विट्स, जोक्स, मीम्स...! तापसी पन्नू व अनुराग कश्यपवरच्या धाडसत्रानंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा पूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 3:39 PM

नेटक-यांच्या एका गटाने तापसी व अनुरागवरची कारवाई म्हणजे सूडबुद्धी असल्याचे म्हटले. काहींनी यावरून अनुराग व तापसीची मजाही घेतली.

ठळक मुद्देफँटम प्रोडक्शन हाऊसशी संबंधित अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या मालमत्तावर आयकर विभागाने धाडी टाकल्या.  कर चोरी केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे.

दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्याविरोधात आयकर विभागाने आज अचानक धाडसत्र सुरु केले. आयकर विभागाच्या पथकांनी अनुराग व तापसीच्या मुंबईतील मालमत्तावर छापे टाकत झाडाझडती सुरू केली. या दोघांशिवाय विकास बहल आणि मधु मंटेना यांच्या घरीही आयकरने छापे टाकल्याचे वृत्त आहे. तापसी व अनुराग यांच्या मालमत्तावर धाडी पडताच, ट्विटरवर कमेंट्सचा पाऊस सुरु झाला. सोशल मीडियावर मीम्स आणि जोक्सचाही पूर आला.नेटक-यांच्या एका गटाने तापसी व अनुरागवरची कारवाई म्हणजे सूडबुद्धी असल्याचे म्हटले. मोदी सरकारविरोधात बोलणे आणि शेतकरी आंदोलनाला पाठींबा देणे तापसी व अनुरागला भोवल्याचे काहींनी म्हटले. काहींनी यावरून अनुराग व तापसीची मजाही घेतली. एकंदर काय तर आयकर विभागाच्या आजच्या कारवाईनंतर सोशल मीडियाला आणखी एक मुद्दा मिळाला.पाहुया, यावरच्या काही रिअ‍ॅक्शन...

कर चुकवल्याच्या आरोपाखाली आयकर विभागाने ‘फँटम फिल्म’शी संबंधित लोकांच्या घरांवर या धाडी टाकण्यात आल्याचे कळते.  यात फँटम प्रोडक्शन हाऊसशी संबंधित अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या मालमत्तावर आयकर विभागाने धाडी टाकल्या.  कर चोरी केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे. या कर चोरी प्रकरणाचा तपास सुरू असल्याचेही आयकर विभागने स्पष्ट केले आहे. फँटम फिल्म्स चित्रपट निर्मिती आणि  वितरणाचे काम करते. अनुराग कश्यप, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाणे, निमार्ता मधू मंटेना आणि विकास बहल यांनी ही कंपनी 2011 मध्ये सुरू केली होती. सहसंस्थापक विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर कंपनी 2018 मध्ये बंद करण्यात आली होती.

टॅग्स :अनुराग कश्यपतापसी पन्नूबॉलिवूड