Join us

​ twitter trends : ऋषी कपूर केजरीवालांना ‘हे’ काय म्हणून गेलेतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2017 3:36 PM

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर सोशल मीडियावर सतत सक्रीय असतात. केवळ सक्रीयचं नाही तर अनेकदा आपल्या  वक्तव्यांनी वादही ओढवून घेतात. ...

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर सोशल मीडियावर सतत सक्रीय असतात. केवळ सक्रीयचं नाही तर अनेकदा आपल्या  वक्तव्यांनी वादही ओढवून घेतात. त्यांचे tweets अनेकदा वाद-विवादाला तोंड फोडतात. आता ऋषी कपूर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले आहे. एवढेच नाही तर केजरीवाल यांना नवे नाव बहाल केले आहे. होय, ऋषी कपूर यांनी केजरीवाल यांना ‘कम्प्लेंट बॉक्स’ असे नवे नाव दिले आहे. आता यावरून नवा वाद निर्माण झाला नसेल तर नवल.बुधवारी निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहिर केल्या आणि आम आदमी पार्टीने यावर आक्षेप घेतला. निवडणुकाच्या या तारखा आचार संहितेचे उल्लंघन करतात, असे आम आदमी पार्टीचे म्हणणे होते. कारण केंद्रीय अर्थसंकल्प या निवडणूक तारखांच्या ऐन तोंडावर जारी केला जाणार आहे. आम आदमी पार्टीचे प्रवक्ते आशुतोष यांनी निवडणूक आयोगाने तारखा जाहिर करताच त्यावर आक्षेप नोंदवणारे tweet केले. नेमकी हीच गोष्ट ऋषी कपूर यांना खटकली. मग काय, केजरीवालांनी त्यांनी थेट सवाल केला. ‘केजरीवालजी, तुम्ही नेहमी तक्रारी का करता? तुमचे नाव मिस्टर कम्प्लेंट बॉक्स ठेवायला हवे. तुम्ही कधीच समाधानी नसता,’ असे tweet ऋषी कपूर यांनी केले.ऋषी कपूर यांच्या या tweetवर  केजरीवाल यांनी अद्याप तरी उत्तर दिलेले नाही. पण ते काय उत्तर देतात, ते पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर यांनी करिना कपूरच्या मुलाच्या नावाची टर उडवणाºया नेटिजन्सला फटकारले होते. करिना कपूरने आपल्या मुलाचे नाव तैमूर अली खान असे ठेवले आहे. काहींनी या नावाची खिल्ली उडवली होती. यामुळे ऋषी कपूर जाम संतापले होते. करिनाने आपल्या बाळाचे नाव काय ठेवावे, हे तुम्ही सांगण्याची गरज नाही. तुम्ही तुमचे काम करा, अशा शब्दांत त्यांनी टीकाकारांना सुनावले होते.