बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने लॉकडाऊनपासूनच प्रवासी मजूरांची मदत करणं सुरू केलं. लोकांना घरी पोहोचवण्यापासून ते त्यांना जेवण, आर्थिक मदत, घर, जनावरं अशीही मदत त्याने केली आणि तो केवळ पडद्यावरच नाही तर अनेकांच्या रिअल लाईफमध्ये हिरो ठरला. अजूनही लोकांना मदत करण्याचा सोनूचा सिलसिला सुरूच आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला लोक अजूनही मदत मागत आहेत. अशात काही लोक विचित्र मागण्यांही करतात. आता एका सोनूकडे चक्क भाजपाची तिकिट मागितली आहे. त्यावर सोनूने मजेदार उत्तर दिलंय.
सोनूला ट्विटरच्या माध्यमातून देशभरातील लोक वेगवेगळी मदत मागतात. मदतीसाठी त्याला हजारो मेसेज येतात. यात काही लोक खोडकरपणाही करताना दिसतात. काहींनी त्याला आयफोन मागितला तर काहींनी त्याला आणखी काही विचित्र वस्तू मागितली. पण सोनूही यांच्या मेसेजना मजेदार उत्तरे द्यायचा चान्स सोडत नाही. आता एकाने केलेली विचित्र मागणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
अंकित नावाच्या एका यूजरने अभिनेता सोनू सूदला टॅग करत लिहिले की, 'सर, यावेळी मला बिहारच्या भागलपूरमधून विधानसभा निवडणूक लढवायची आहे आणि वियजी होऊन लोकांची सेवा करायची आहे. बस सोनू सर, तुम्ही मला भाजपाचं तिकीट द्या'.
आता हजारो लोकांच्या मदतीसाठी धावून येणाऱ्या सोनूने या व्यक्तीला मजेदार उत्तर दिलंय. सोनू सूदने ट्विट केलं की, 'बस, ट्रेन आणि प्लेनच्या तिकीटाशिवाय मला दुसरं कोणतंही तिकीट द्यायला जमत नाही माझ्या भावा'. तसेच यासोबत त्याने हात जोडल्याचा इमोजीही शेअर केला. या व्यक्तीचं ट्विट आणि सोनूचं त्यावर मजेदार उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. लोक त्यावर मजेदार कमेंट आणि रिअॅक्शन देत आहे.
दरम्यान, एका चाहत्याने सोनू सूदकडे थेट Iphone ची मागणी केली आहे. सोशल मीडियावर एकाने सोनू सूदला ट्विट करत लिहिले की, मला एक आयफोन पाहिजे. मी त्यासाठी तुम्हाला आतापर्यंत २० वेळा ट्विट केलं होतं. सोनू सूदने चाहत्याची ही अजब मागणी पूर्ण केली नाही परंतु त्याला मजेशीर उत्तर दिले होते.
सोनूने त्याच्या ट्विटला रिप्लाय देताना सांगितले की, मलाही एक फोन हवा आहे. मी कित्येक दिवस झाले त्यासाठी वाट पाहतोय. मी यासाठी तुम्हाला २१ वेळाही ट्विट करु शकतो. या गंमतीशीर उत्तरासोबत सोनूने स्माईली इमोजीही पाठवला. सोनू सूदकडे याआधीही अनेक चाहत्यांनी अजब मागण्या केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सोनूला एका युजरने प्ले स्टेशन मागितले. तेव्हा सोनूने त्याला उत्तर दिले की, तू नशीबवाला आहेस तुझ्याकडे प्ले स्टेशन नाही, मी तुला पुस्तकं देऊ शकतो.
'बधाई हो', 'बालिका वधु' फेम सुरेखा सिक्रीकडे नव्हते उपचारासाठी पैसे, मददतीसाठी पुढे आला सोनू सूद
दिलदार सुपरहिरो! सिम कार्डवर सोनू सूदचं चित्र, अभिनेत्याने दिली भन्नाट रिअॅक्शन
देशातील शिक्षण क्षेत्रासाठी ठरणार का दूत, पुढाकार घेतोय सोनू सूद