Join us

दोन ‘नटसम्राट’ एकाच सिनेमात,‘काला’मध्ये रंगणार रजनी आणि नानाची जुगलबंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2018 9:16 AM

नाना पाटेकर यांच्या 'काला, कैसा नाम है रे...' या डायलॉगने या टीझरची सुरुवात होते.

एकाच सिनेमात दोन दिग्गज कलाकारांची जुगलबंदी पाहायला मिळाली तर… तुम्हीसुद्धा म्हणाल क्या बात है. दोघंही कलाकार अभिनयात बाप, त्यांच्या अभिनयावर रसिक फिदा, पडद्यावरील त्यांचं बोलणं आणि वागणं सारं काही ग्रेट… असेच अभिनयाचे सम्राट असणारे दोन कलाकार एकत्र येत आहेत. निमित्त आहे 'काला' या आगामी सिनेमाचे. या सिनेमात सुपरस्टार रजनीकांत आणि नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असून यांत दोघांची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. नुकतंच 'काला' या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. यांत रजनीकांत हा डॉनच्या भूमिकेत झळकणार आहेत.नाना पाटेकर यांच्या 'काला, कैसा नाम है रे...' या डायलॉगने या टीझरची सुरुवात होते.रजनीकांत यांचा जावई धनुषने या सिनेमाची निर्मिती केली आहे.टीझर रिलीज झाल्यावर लगेचच त्याला रसिकांची पसंती मिळू लागलीय.लाखो रसिकांनी हा टीझर यूट्यूबवर पाहिलाय.त्यामुळे 'काला' या सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.आता रसिकांना सिनेमाची प्रतीक्षा असून हा तो २७ एप्रिलला रसिकांच्या भेटीला येणार आहे. अंजली पाटील दाक्षिणात्य सुपरस्टार रजनिकांत यांच्यासोबत काला या चित्रपटात झळकणार आहे. रजनिकांत यांच्यासोबत काम करायला मिळत असल्याने अंजली चांगलीच खूश आहे. तिच्या करियरमधील हा सगळ्यात मोठा चित्रपट असल्याने ती या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. रजनिकांत यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला असल्याचे ती सांगते. अंजली तिच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या अनुभवाविषयी सांगते, गेल्या ४० वर्षांपासून रजनिकांत यांनी चित्रपटसृष्टीत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ते सुपरस्टार असले तरी ते खूपच नम्र आहेत. लोकांशी नम्रतेने कसे वागायचे ही गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. आजवर त्यांच्याइतका नम्र कलाकार मी पाहिलेला नाही. आजवर अनेक चित्रपटात काम करूनही प्रत्येक चित्रपट हा त्यांचा पहिला चित्रपट असल्यासारखेच ते वागतात. ते सेटवर खूपच उत्साहित असतात. तसेच नवनव्या गोष्टी शिकण्याकडे त्यांचा कल असतो. प्रत्येक कलाकाराने त्यांच्याकडून शिकले पाहिले. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे.अंजलीने याआधीदेखील अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केले आहे.