Uday Chopra Laugh At Mother Pamela Chopra Funrel : दिवंगत यश चोप्रा यांच्या पत्नी व आदित्य तसेच उदय चोप्राच्या आई पामेला चोप्रा यांचं काल गुरुवारी निधन झालं. कालच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झालेत. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी पामेला यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. पण यावेळी असं काही घडलं की, उदय चोप्रा जबदस्त ट्रोल झाला. होय, सांत्वनासाठी आलेल्या सेलिब्रिटींसोबत उदय चोप्रा हसत हसत भेटताना दिसला. याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि तो पाहून नेटकऱ्यांनी उदय चोप्राला ट्रोल करायला सुरुवात केली. अरे, तुझ्या आईचं निधन झालं आहे, हे काही लग्नाचं रिसेप्शन नाही, अशा शब्दांत अनेकांनी उदय चोप्राला सुनावलं. उदय चोप्राची आई पामेला यांच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी चोप्रा कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी त्यांच्या घरी पोहोचले.
अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, रणवीर सिंग, विकी कौशल, शबाना आझमी, श्रद्धा कपूर यांच्यासह अनेक या कलाकारांनी आदित्य चोप्रा, राणी मुखर्जी उदय चोप्रा यांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. याचदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत उदय चोप्रा हसताना दिसतोय.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत आमिर खान व किरण राव दिसत आहेत. आमिर व किरण चोप्रा यांच्या घरी पोहोचतात. त्यांना भेटताना उदय चोप्रा हसताना दिसतो. आईच्या निधनानंतर उदय हसत हसत सर्वांना भेटतो हे पाहून नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘ याला कोणत्या प्रसंगी कोणते एक्सप्रेशन द्यावेत, हेच माहित नाही. म्हणूनच फ्लॉप झाला,’असं एकाने लिहिलं.
‘आपल्या आईच्या निधनावर हसणारा पहिला मुलगा पाहिला,’ ‘भावा, अंबानीचा इव्हेंट नाही, तर अंत्यसंस्कार आहे’, ‘अरे तुझ्या आईचं निधन झालंय, लग्नाचं रिसेप्शन नाही’, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
पामेला यांना 15 दिवसांपूर्वी मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्या उपचार सुरू होते. त्या व्हेंटिलेटरवर होत्या. गुरुवारी सकाळी त्यांची प्रकृती आणखी बिघडली. यादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पामेला या आदित्य आणि उदय चोप्रा यांच्या आई होत्या. जवळपास 11 वर्षांपूर्वी पामेला यांचे पती यश चोप्रा यांचं निधन झालं होतं.