Join us

बाईsss हा काय प्रकार! उदित नारायण यांनी लाइव्ह शोमध्येच फॅनला केलं लिप किस, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 10:58 IST

लाइव्ह शोमध्येच उदित नारायण यांनी फॅनला लिप किस केलं अन्...; पुढे काय घडलं पाहा, नेटकरी करत आहेत ट्रोल

उदित नारायण हे बॉलिवूडमधील दिग्गज गायक आहेत. आजवर अनेक गाण्यांनी त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. पण, सध्या मात्र उदित नारायण एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. उदित नारायण यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका लाइव्ह शो दरम्यानचा हा व्हिडिओ आहे. 

लाइव्ह शो दरम्यानच उदित नारायण यांनी एका महिलेला किस केल्याचा प्रकार घडला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये उदित नारायण 'टिप टिप बरसा पानी' हे गाणं गाताना दिसत आहेत. ते स्टेजवर परफॉर्म करत असताना एक महिला फॅन त्यांच्याबरोबर सेल्फी काढायला येते आणि त्यांच्या गालावर किस करत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर उदित नारायण त्या महिलेला लिप किस करत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. 

लाइव्ह शोमधील हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. याबरोबरच त्यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये सेल्फी काढायला येणाऱ्या प्रत्येक महिलेला ते किस करत असल्याचं दिसत आहे. 

या व्हिडिओवरुन नेटकरी उदित नारायण यांना ट्रोल करत आहेत. "यांच्या घटस्फोटाची बातमी लवकरच येऊ शकते", "आदित्य तुझ्या वडिलांना सांभाळ" असं म्हणत त्यांना ट्रोल केलं आहे. तर यावर अद्याप उदित नारायण यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

टॅग्स :उदित नारायणसेलिब्रिटी