Join us

या आजारांनी त्रस्त आहेत उदित नारायण; रुग्णालयात दाखल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 10:37 AM

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, ६२ वर्षीय उदित ...

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, ६२ वर्षीय उदित नारायण यांना युरिन इनफेक्शन आणि उच्च मधुमेह असल्याने त्यांची प्रकृती सातत्याने खालवत आहे. यामुळे त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, उदित नारायण सध्या दोन प्रकारच्या मधुमेहामुळे त्रस्त आहेत. महिनाभरापूर्वी ग्लुकोज लेव्हल हाय झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मधुमेहाबरोबरच उच्च रक्तदाबाचाही त्यांना त्रास असून, त्याचमुळे युरिन इनफेक्शन झाल्याची माहिती समोर येत आहे. उदित यांचा मुलगा गायक आदित्य नारायणच्या मर्सिडीज कारने एका आॅटो रिक्शाला धडक दिली होती. हा अपघात मुंबईतील अंधेरी परिसरात घडला होता. या अपघातात आॅटोचालक आणि त्यात बसलेली एक महिला जखमी झाली होती. या प्रकरणी आदित्यवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामिनावर त्याची सुटका झाली. त्यातच आता आदित्यचे वडील उदित नारायण यांना रुग्णालयात दाखल केल्याने नारायण कुटुंबीयांच्या अडचणींमध्ये सातत्याने भर पडत आहे. दरम्यान, उदित नारायण यांना २००९ मध्ये भारत सरकारच्या वतीने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आपल्या सुमधुर आवाजामुळे त्यांना तीन वेळा बेस्ट सिंगरचा नॅशनल अवॉर्डही मिळाला होता. त्याचबरोबर त्यांना सर्वोत्कृष्ट गायक या श्रेणीत फिल्मफेअरचे पाच अवॉर्डही मिळाले आहेत. त्यांना हे अवॉर्ड ‘कयामत से कयामत तक, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, राजा हिंदुस्तानी, हम दिल दे चुके सनम, आशिकी, लगान’ या सुपरहिट चित्रपटांसाठी मिळाले. उदित नारायण यांनी आतापर्यंत ३० भाषांमध्ये १५ हजारांपेक्षा अधिक गाणी गायिली आहेत.