Join us

Unbelievable : ट्रेनरच्या आग्रहास्तव शाहरूख खानने पहिल्यांदाच टाकले जीममध्ये पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2017 9:32 AM

​पिळदार शरीर यापेक्षा आताच्या भाषेत सांगायचे झाल्यास ‘सिक्स पॅक्स अ‍ॅब्स’ असलेल्या शाहरूख खानला आपण बºयाचदा पडद्यावर त्याचे प्रदर्शन करताना बघितले आहे; मात्र हे ‘सिक्स पॅक्स अ‍ॅब्स’ शरीर कमविण्यासाठी त्याने एकदाही जीममध्ये पाऊल टाकलेले नाही.

पिळदार शरीर यापेक्षा आताच्या भाषेत सांगायचे झाल्यास ‘सिक्स पॅक्स अ‍ॅब्स’ असलेल्या शाहरूख खानला आपण बºयाचदा पडद्यावर त्याचे प्रदर्शन करताना बघितले आहे; मात्र हे ‘सिक्स पॅक्स अ‍ॅब्स’ शरीर कमविण्यासाठी त्याने एकदाही जीममध्ये पाऊल टाकलेले नाही. विश्वास बसत नाही. होय हे खरे आहे. घरातच जीम असल्याने त्याला बाहेरच्या जीममध्ये जाण्याची कधी गरजच भासली नाही. परंतु त्याचा ट्रेनर प्रशांतच्या आग्रहास्तव त्याने पहिल्यांदाच बाहेरच्या जीममध्ये पाऊल टाकले आहे. मग काय यावरून चर्चा रंगली नसेल तरच नवल.  त्याचे झाले असे की, गेल्या २० वर्षांपासून शाहरूखला ट्रेनिंग देत असलेला ट्रेनर प्रशांतला शुभेच्छा देण्यासाठी शाहरूख त्याच्या जीममध्ये पोहचला होता. यावेळी शाहरूखने प्रशांतसोबतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून, त्यामध्ये तो प्रशांतचे कौतुक करताना बघावयास मिळत आहे. त्यामुळे प्रशांतसाठी शाहरूखचा हा व्हिडीओ अनमोल असून, त्याचा तो जीमच्या ब्रॅण्डिंगसाठी वापर करण्याची शक्यता आहे. शाहरूखने ज्या जीममध्ये हा व्हिडीओ शूट केला आहे, त्यावरून ती जीम अगदीच नवीन वाटत आहे. या व्हिडीओमधून शाहरूखने त्याच्या फॅन्सला जीम जॉइन करण्याचे आवाहन केले आहे. शाहरूखने हा व्हिडीओ ‘बॉडी स्कल्पचर’ नावाच्या जीममध्ये शूट केला आहे. विशेष म्हणजे शाहरूखनेच तो कधीही घराव्यतिरिक्त इतर जीममध्ये गेला नसल्याचा खुलासा केला आहे. या व्हिडीओ कॅप्शनमध्ये शाहरूखने लिहिले की, पहिल्यांदाच ‘बॉडी स्कल्पचर’मध्ये गेलो होतो. वर्कआउट केले अन् हेल्दी डिनरही केले. जीमचे कौतुक करताना शाहरूखने म्हटले की, अशी जीम मी जगात कुठेच बघितली नाही. या वर्षाच्या सुरुवातीला रिलिज झालेल्या शाहरूखच्या ‘रईस’ने बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली असल्याने, तो समाधानी आहे. यावर्षात शंभर कोटी रुपयांचा गल्ला जमविणारा ‘रईस’ हा पहिलाच सिनेमा ठरला होता. शाहरूखसोबत नवाजुद्दीन सिद्दीकी याचीही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.  ">http://