बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे चर्चेत आहे. मुद्दा कुठलाही असो. अगदी देशाच्या कोप-यात साधे खट् झाले तरी कंगनाची टिवटिव सुुरू होते. कंगनाची ही टिवटिव काही लोकांना आवडते तर काही लोकांचा यामुळे संताप होतो. अनेकजण तिला गप्प बसण्याचा सल्ला देतात. पण हा सल्ला इतक्या सहजी मानणा-यांपैकी कंगना नाही. आता तर गप्प बस म्हणणा-यांनाच कंगनाने सल्ला दिला आहे.
कंगनाने यासंदर्भात एक ट्विट केले आहे. ‘ ते चाहते जे दिवसभर माझे ट्विट चेक करतात आणि माझ्या गोष्टींमुळे कंटाळल्याचे सांगून मला गप्प बसण्याचा सल्ला देतात, त्यांनी मला ब्लॉक करावे. तुम्ही मला ब्लॉक करत नसाल तर याचा अर्थ स्पष्ट आहे, तुम्ही माझ्यावर फिदा आहात. द्वेष करणा-या व्यक्तिसारखे माझ्यावर प्रेम करू नका. यापेक्षा चांगला मार्ग मिळत नसेल तर फक्त प्रेम करा,’ असे तिने या पोस्टमध्ये लिहिले.कंगनाचे अनेक चाहते आहेत. पण अलीकडे हेच चाहते तिच्या राजकीय विचारांची निंदा करू लागले आहेत. अर्थात या टीकेची, निंदाची कंगनाला जराही पर्वा नाही. तिच्या पोस्टमधून हे स्पष्ट आहे.
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या ती ‘थलायवी’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. या सिनेमात ती तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. यानंतर ‘तेजस’ या सिनेमात तिची वर्णी लागली आहे. येत्या डिसेंबरमध्ये कंगना या सिनेमाचे शूटींग सुरु करणार आहे. याशिवाय ‘धाकड’ हा सिनेमा तिने साईन केला आहे. यात कंगना अॅक्शन अवतारात दिसणार आहे.
जो बायडन यांना म्हणाली ‘गजनी’
अलीकडे कंगनाने अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची खिल्ली उडवली होती.‘गजनी बायडन यांच्याबद्दल मी पूर्णपणे आश्वस्त नाही. ज्यांचा डाटा प्रत्येक 5 मिनिटाला क्रॅश होतो. इतक्या औषधांचे इंजेक्शन त्यांच्यात इंजेक्ट केले गेलेत की, ते एक वर्षांपेक्षा अधिक काळ टिकू शकणार नाहीत. त्यामुळे कमला हॅरीस याच शो पुढे नेतील, हे स्पष्ट आहे. जेव्हा एक महिला पुढे जाते, तेव्हा आपल्यासोबत ती अन्य महिलांसाठीही मार्ग तयार करते. या ऐतिहासिक दिवसासाठी चीअर्स,’असे टिष्ट्वट तिने केले होते. ‘गजनी’ या सिनेमात आमिरला ‘शॉर्ट टर्म मेमरी लॉस’ असल्याचे दाखवले होते. कंगनाच्या मते, बायडन हे सुद्धा विसरळभोळे आहेत. अमेरिकन उपराष्ट्रपती निवड झालेल्या कमला हॅरीस यांच्या विजयावर मात्र तिने आनंद व्यक्त केला होता.