Carry Minati Birthday : युट्यूबसाठी कॅरीने सोडली होती 12ची परीक्षा, Carryबाबत माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 02:03 PM2020-06-12T14:03:28+5:302020-06-12T14:27:27+5:30

युट्यूबवरील लोकप्रिय स्टार कॅरी मिनाटी आज 21 वर्षांचा झाला आहे.

Unknown things about carry minati | Carry Minati Birthday : युट्यूबसाठी कॅरीने सोडली होती 12ची परीक्षा, Carryबाबत माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घ्या

Carry Minati Birthday : युट्यूबसाठी कॅरीने सोडली होती 12ची परीक्षा, Carryबाबत माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घ्या

googlenewsNext

सोशल मीडियावर झालेल्या  युट्यूब विरूद्ध टिक टॉकवॉर नंतर कॅरी मिनाटी हे नाव घराघरात पोहोचले.  युट्यूबवरील लोकप्रिय स्टार कॅरी मिनाटी आज 21 वर्षांचा झाला आहे.  त्याचे खरे नाव अजय नागर. फरीदाबादचा या अजयचे युट्यूबवरCarryMinati और ​​CarryIsLive अशी दोन चॅनल्स आहेत. कॉमेडियन, रॅपर आणि आता युट्यूब स्टार अशी त्याची ओळख आहे. काही दिवसांपूर्वीच कॅरीचे यल्गार हे रॅप साँग रिलीज झाले आहे. 10 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी हे गाणं आतापर्यंत पाहिले आहे. युट्यूब विरूद्ध टिक टॉकवॉरचा चांगलाच फायदा कॅरी मिनाटीला झाला. आज आम्ही तुम्हाला कॅरीबाबत माहिती नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत. 

युट्यूबमध्ये करिअरसाठी कॅरीने मध्येच शिक्षण सोडले. अगदी 12 वी परीक्षा न देण्याचा निर्णय त्याने घेतला. त्याच्या कुटुंबीयांनी देखील तिला सोपर्ट दिला होता. वर्षभर यूट्यूबमध्ये व्यस्त असल्यामुळे त्याने अभ्यास केला नव्हता. बारावीच्या इकॉनॉमिक्सच्या पेपरच्या एक दिवस आधी त्यांनी आपल्या वडिलांना पेपर देत नाही असे सांगितले. वडिलांनी देखील कॅरीची ही गोष्ट मान्य केली. अर्थात पुढे त्याने हे शिक्षण पूर्ण केले, हा भाग वेगळा. अजय नागर कॅरी मिनाटी नावाने युट्यूबवर लोकप्रिय आहे. युट्यूबवर लोकांची खिल्ली उडवणारे व्हिडीओ शेअर करणे शिवाय लाईव्ह गेमिंगसाठी तो ओळखला जातो.

वयाच्या 10 व्या वर्षापासून कॅरीने युट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करणे सुरु केले होते. अगदी सुरुवातीला सनी देओलची मिमिक्री करणारा व्हिडीओ त्याने पोस्ट केला होता. 2014 मध्ये त्याने कॅरीमिनिटी हे मूळ युट्यूब चॅनल सुरु केले. 2017 मध्ये CarryIsLive आणखी एक युट्यूब चॅनल उघडले. कॅरीने जानेवारी 2019 मध्ये युट्यूबपर Pewdiepie विरोधात ‘Bye Pewdiepie’ नावाने एक डिस गाणे साद केले होते. ते प्रचंड लोकप्रिय झाले होते. 24 तासांत या गाण्याला 5 मिलियन व्ह्युज मिळाले होते. 2019 या सालात टाईम मॅगझिनद्वारा नेक्स्ट जनरेशन लीडर्स 2019 व्या यादीत कॅरी दहाव्या क्रमांकावर होता. 

Web Title: Unknown things about carry minati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.