संजय लीला भन्साळी हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्यांच्या चित्रपटात काम करणे हे कोणत्याही कलाकाराचे स्वप्न असते. त्यांनी 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास', 'ब्लॅक', 'गुजारिश', 'गोलियों की रासलीला राम-लीला', 'पद्मावत', 'बाजीराव मस्तानी', 'गंगूबाई काठियावाडी', असे अनेक उत्तमोत्तम चित्रपट बॉलिवूडला दिले. पण तुम्हाला माहित आहे का त्यांच्या खऱ्या आयुष्यातील लव्हस्टोरी अर्धवट राहिली. त्यांच्या लग्नाची तयारी देखील झाली होती पण हे लव्ह स्टोरी अपूर्ण राहिली.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, पद्मश्री असे अनेक पुरस्कारही त्यांच्या नावावर होते. त्यांना आयुष्यात सर्व काही मिळवले, परंतु ते प्रेमात अयशस्वी ठरले.
संजय लीला भन्साळी कोरिओग्राफर वैभवी मर्चंटच्या प्रेमात पडला होते. बी-टाऊनमध्ये त्यांच्या लग्नाची चर्चा जोरात सुरू होती, पण दोघांचं लग्न होऊ शकलं नाही आणि संजय आणि वैभवची प्रेमकहाणी अपूर्णच राहिली.
संजय लीला यांनी 1999 मध्ये 'दिल दे चुके सनम' हा चित्रपट करत होते. या चित्रपटात सलमान खान आणि ऐश्वर्याच्या जोडीने धमाल केली होती. या चित्रपटातून वैभवी मर्चंटने तिच्या करिअरला सुरुवात केली. या चित्रपटातील 'ढोली तारो ढोल बाजे' या गाण्याची कोरिओग्राफी तिने केली होती. याच सेटवर संजय लीला भन्साळी आणि वैभवी यांच्यात मैत्री झाली आणि प्रेमाचे किस्से सुरू झाले.
पण 2007 मध्ये रिलीज झालेल्या 'सावरिया' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये सर्व काही बदलले. दोघांची एंगेजमेंट झाली आहे आणि लवकरच ते लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याच्या बातम्याही आल्या, पण नंतर त्या अफवा ठरल्या.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय भन्साळी आणि वैभवी मर्चंटमध्ये बरेच मतभेद होते. दोघांच्याही लक्षात आले की त्यांच्यात इतके घट्ट नाते नाही की ते लग्नापर्यंत पोहोचू शकेल. या कारणावरून दोघांनी परस्पर संमतीने माघार घेत आपलं नात्याला पूर्णविराम दिला.