Join us

Video - बापरे! उर्फी संतापली, रागाच्या भरात हेअर ड्रेसरच्या चेहऱ्यावर फेकलं पाणी, मग खुर्चीवरून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 12:12 IST

Uorfi Javed : उर्फी जावेद तिच्या विचित्र फॅशन आणि अजब शैलीसाठी सोशल मीडियावर फेमस झाली आहे. पण यावेळी उर्फी तिच्या हटके फॅशनमुळे नाही तर तिच्या रागामुळे प्रकाशझोतात आली आहे

इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद (Uorfi Javed) तिच्या विचित्र फॅशन आणि अजब शैलीसाठी सोशल मीडियावर फेमस झाली आहे. पण यावेळी उर्फी तिच्या हटके फॅशनमुळे नाही तर तिच्या रागामुळे प्रकाशझोतात आली आहे. नुकताच उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. उर्फी जावेद या व्हिडीओमध्ये काहीशी रागावलेली दिसत आहे, ती वेगवेगळ्या गोष्टी बोलताना दिसत आहे. मग उर्फी रागाने ओरडू लागते.

बाटलीतून पाणी तिच्या हेअर ड्रेसरच्या चेहऱ्यावर फेकते. हा एक प्रकारचा प्रँक असल्याचं नंतर समोर आलं आहे. मात्र या व्हिडीओमुळे उर्फी सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होऊ लागली आहे. व्हिडिओमध्ये उर्फी जावेद तिच्या टीमसोबत दिसत आहे. उर्फीला तीन मुलींनी घेरलेले दिसले, त्यापैकी एक तिचे केस विंचरत आहे, नंतर उर्फी कामाबद्दल रागाने ओरडू लागते. मुलींना काही समजण्याआधीच भलतंच घडतं.

उर्फी बाटलीतून हेअर ड्रेसरच्या चेहऱ्यावर पाणी टाकले. उर्फी जावेदचे हे वागणे पाहून तेथे उपस्थित असलेले सर्वजण हैराण झाले. तर उर्फी खुर्चीवरून उभी राहून जोरजोरात हसायला लागली. उर्फी सांगते की हा एक प्रँक होता. त्यानंतर सर्वच जण हसतात. 

उर्फी जावेद एका हेअर ड्रेसरसोबत असे वागल्याने तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. ट्रोल झाल्यानंतर उर्फीने इन्स्टाग्रामवरून हा व्हिडीओ हटवला आहे. उर्फीचा व्हिडीओ इतर अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून ज्यामध्ये ती तिच्या टीमसोबत प्रँक करताना दिसत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :उर्फी जावेद