Join us

Uorfi Javed : "हनुमानजी असं कसं..."; उर्फी जावेदने 'आदिपुरुष'मधील डायलॉग्सबाबत रोखठोक सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 10:29 AM

Uorfi Javed And Adipurush : उर्फी जावेदने आदिपुरुष या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे.

ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपट रिलीज होताच वादात सापडला. प्रेक्षकांना चित्रपटाचे फक्त VFX आवडले नाहीत, तर चित्रपटातील संवादांवरही लोकांनी आक्षेप घेतला. चित्रपटातील पौराणिक पात्रांच्या तोंडी अतिशय बाईट भाषा दिल्याचा आरोप होत आहे. या सर्व गोंधळादरम्यान, निर्मात्यांनी चित्रपटातील संवाद बदलले आहेत. याच दरम्यान उर्फी जावेदने (Uorfi Javed) देखील आदिपुरुष या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे.

उर्फीने "मी आदिपुरुष आतापर्यंत पाहिलेला नाही मात्र रिल्स पाहिले आहेत. चित्रपट पाहिला नाही त्यामुळे मी फार काही बोलू शकत नाही. मात्र जे काही डायलॉग्स पाहिले, ते पाहून हाच प्रश्न पडला की हनुमानजी असं कसं बोलू शकतात? मला असं वाटतं की, सर्वात चांगलं रामायण तेच होतं, जे मी लहानपणी पाहिलं होतं. ते सर्वांनीच पाहिलं असेल. हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो किंवा ख्रिश्चन.. प्रत्येकाने ते एकदा तरी पाहिलंच असेल. त्याची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही" असं म्हटलं आहे. उर्फी जावेदने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत आदिपुरुष चित्रपटावर भाष्य केलं आहे.

चित्रपट रिलीज झाल्याच्या दोन दिवसानंतर लेखक मनोज मुंतशिर यांनी वाढता वाद पाहता, चित्रपटातील संवाद बदलणार असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे चित्रपटातील वादग्रस्त संवाद बदलण्यात आले . आधी चित्रपटात “कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, जलेगी भी तेरे बाप की,” हा संवाद होता. या संवादावरुनच गोंधळ उडाला होता. पण, आता हा संवाद बदलण्यात आला आहे.

सध्या सोशल मीडियावर चित्रपटातील एक सीन व्हायरल होतोय, ज्यामध्ये हनुमानाची भूमिका साकारणारा देवदत्त नागे बदललेले डायलॉग बोलताना दिसत आहेत. ज्या संवादात पूर्वी 'बाप' हा शब्द होता, आता तिथे 'लंका' हा शब्द वापरला गेला आहे. आता देवदत्त नागे म्हणतो, ‘कपडा तेरी लंका का, तेल तेरी लंका का, आग भी तेरी लंका की और जलेगी भी तेरी लंका ही...’ दरम्यान, चित्रपटात आणखी काही संवाद आहेत, ज्यावरही लोकांनी आक्षेप घेतला आहे.

चित्रपटात प्रभासने श्रीरामाची भूमिका साकारली आहे, तर क्रिती सेनन माता सीनेच्या, सैफ अली खान रावणाच्या आणि देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने सुरुवातीच्या दोन-तीन दिवसांत चांगली कामगिरी केली, मात्र आता बॉक्स ऑफिसवर चित्रपट थोडासा सुस्त झालेला पाहाला मिळत आहे. पाच दिवसांत या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर सूमारे 400 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

टॅग्स :उर्फी जावेदआदिपुरूषबॉलिवूड