उपेंद्र लिमये, क्रांती रेडकर, विक्रम गोखले दिसणार 'या' सिनेमात एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 08:00 AM2019-04-09T08:00:00+5:302019-04-09T08:00:00+5:30
सध्या सगळीकडे क्रिकेटचा माहोल दिसतोय. निवडणूकांच्या धामधूमीतही क्रिकेटप्रेमी घरबसल्या आयपीएलच्या मॅचेसचा आनंद घेताहेत.
सध्या सगळीकडे क्रिकेटचा माहोल दिसतोय. निवडणूकांच्या धामधूमीतही क्रिकेटप्रेमी घरबसल्या आयपीएलच्या मॅचेसचा आनंद घेताहेत. त्यानंतर काही दिवसात विश्वचषकाची सुरुवात होणार आहे. लहानांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सगळेच त्यात रंगून जाताना दिसणार आहे. त्यातही बच्चेकंपनीचा आनंद काही औरच ....!!
मराठी चित्रपटसृष्टीसुद्धा त्यापासून दूर नाहीये. क्रिकेटच्या विषयावर आधारलेला ‘बाळा’ हा मराठी चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. क्रिकेटला आपलं सर्वस्व मानणाऱ्या एका चिमुरड्याची गोष्ट ‘बाळा’ या आगामी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. नुकतीच या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित झाली आहे. ‘यश अँड राज एंटरटेंन्मेट’ या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती झाली असून सचिंद्र शर्मा यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. येत्या ३ मे ला ‘बाळा’ चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
उपेंद्र लिमये, क्रांती रेडकर, विक्रम गोखले, सुहासिनी मुळ्ये, कमलेश सावंत या कलाकारांसोबत मिहीरीश जोशी हा नवा चेहरा या चित्रपटात दिसणार आहे.
या चित्रपटाचे निर्माते राकेश सिंग तर सहनिर्माते मधु सिंग आहेत. कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी अजय सिंग यांनी सांभाळली आहे. छायांकन आर.आर प्रिन्स तर संकलन अभिजीत कुंदार यांचे आहे. गीते विजय गमरे यांनी लिहिली असून संगीत महेश राकेश यांचे आहे. पटकथा सचिंद्र शर्मा, शाहिद खान यांनी लिहिली आहे. नृत्यदिग्दर्शन विष्णू देवा, हबीबा रेहमान, फुलवा खामकर यांनी केले आहे. वेशभूषा चैत्राली डोंगरे यांची आहे. येत्या ३ मे ला चौकार षटकारांची बरसात करायला ‘बाळा’ चित्रपटगृहात दाखल होणार आहे.