Join us

VIDEO : कंगना राणौतची सटकली! भर पत्रकार परिषदेत पत्रकारासोबत भांडली!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 10:15 IST

लवकरच कंगनाचा ‘जजमेंटल है क्या’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि कंगना यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी तिने काय केले तर एका पत्रकारासोबत ‘पंगा’ घेतला.

ठळक मुद्देहा सगळा वाद सुरु असताना चित्रपटाची निर्माती एकता कपूर, अभिनेता राजकुमार राव, चित्रपटाची लेखिका कनिका ढिल्लन, दिग्दर्शक  प्रकाश कोवलामुडी असे सगळे स्टेजवर होते.अखेर एकताने मध्यस्ती करून वाद निवळण्याचा प्रयत्न केला.

कंगना राणौतचा कुठलाही चित्रपट येवो, वाद हा ठरलेलाच. नव्या चित्रपटासोबतच्या प्रदर्शनासोबत जुने वाद आएि बॉलिवूडवर आगपाखड करण्याची एकही संधी कंगना सोडत नाही. लवकरच कंगनाचा ‘जजमेंटल है क्या’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि कंगना यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी तिने काय केले तर एका पत्रकारासोबत ‘पंगा’ घेतला. भर पत्रकार परिषदेत एका पत्रकारासोबत ती जोरदार भांडली.पीटीआय वृत्तसंस्थेचे पत्रकार जस्टीन राव यांनीपत्रकार परिषदेत कंगनाला प्रश्न विचारला. प्रश्न विचारण्याआधी त्यांनी आपले नाव सांगितले. त्यांचे नाव ऐकून कंगनाला तिच्याबद्दल लिहिलेली एक बातमी आठवली. ‘मणिकर्णिका’च्या प्रदर्शनावेळी तिच्याबद्दल ही बातमी लिहिण्यात आली होती. मग काय, क्षणात कंगनाचा पारा चढला आणि तिने पत्रकारावर हल्लाबोल केला.

‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या वेळी माझ्याबद्दल जाणीपूर्वक खोट्या बातम्या लिहिल्या गेल्यात. माझ्याविरोधात खोट्या गोष्टी ट्वीट  केल्या गेल्यात, असा आरोप तिने केला. एवढेच नाही तर जस्टीन राव यांच्यावरही तिने आगपाखड केली. ‘मणिकर्णिका’च्या रिलीजवेळी जस्टिन राव माझी मुलाखत घ्यायला आले होते. ते तीन तास माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये होते. त्यांनी माझ्यासोबत जेवणही केले. पण तरीही माझ्या आणि माझ्या चित्रपटाबद्दल वाईट गोष्टी लिहिल्या. त्यांनी नंतर मला मॅसेजही केला होता, असे कंगना म्हणाली.

तिच्या या आरोपानंतर जस्टीन राव यांनीही आपली बाजू मांडली. कंगनाने केलेले सगळे आरोपत्यांनी फेटाळून लावले. पत्रकार नेहमी सत्य तेच लिहितात. मी तुझ्याविरोधात काहीही वाईट लिहिलेले नाही. मी कधीही तुझ्यासोबत जेवण केलेले नाही आणि तुझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये मी कधीच तीन तास घालवले नाहीत, असे जस्टीन राव म्हणाले. शिवाय मी तुझ्याविरोधात ट्वीट  केले असेल तर त्याचा व तुला केलेल्या मॅसेजचा स्क्रिनशॉट दाखव, असे आव्हानही त्यांनी कंगनाला दिले. त्याचा हा पवित्रा पाहून, मी हे नंतर शेअर करेल, असे कंगना म्हणाली.दोघांमध्ये वाद वाढत असलेला पाहून कार्यक्रमाच्या होस्टने पत्रकारालाच गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. यानंतर अन्य एका पत्रकाराने होस्टला चांगलेच सुनावले. तू त्या दोघांमध्ये बोलू नकोस, असा सल्ला होस्टला दिला.हा सगळा वाद सुरु असताना चित्रपटाची निर्माती एकता कपूर, अभिनेता राजकुमार राव, चित्रपटाची लेखिका कनिका ढिल्लन, दिग्दर्शक  प्रकाश कोवलामुडी असे सगळे स्टेजवर होते.अखेर एकताने मध्यस्ती करून वाद निवळण्याचा प्रयत्न केला.

 

टॅग्स :कंगना राणौतराजकुमार रावमेंटल है क्या