Urfi Javed On Udit Narayan video: उदित नारायण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहेत. व्हिडीओमध्ये उदित नारायण लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान काही महिलांच्या गालावर, तर काहींच्या ओठांचं चुंबन (Udit Narayan Kissing Viral Video) घेताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे त्यांच्यावर चांगलीच टीकाही होतेय. आता या प्रकरणावर उर्फी जावेदनं (Urfi Javed) वक्तव्य केलं आहे.
नुकतंच उर्फीनं इंस्टंट बॉलिवूडला मुलाखत दिली. यावेळी उदित नारायण यांच्याबद्दल प्रश्न विचारताच उर्फीनं "किस किस को प्यार करूं मैं. किस किस को दिल दूं मैं..." हे गाणं गुणगुणलं. ती म्हणाली, "पापा कहते हैं... तो पापा ही बडा नाम करेंगे. 69 वर्षाचे आहेत ना ते... आता त्यांचं वयच असं आहे... उतार वयात असंच होतं".
व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर उदित नारायण यांनीही स्पष्टीकरण दिलं. बॉलिवूड हंगामाशी बोलताना ते म्हणाले, "मी कधी असं काही केलं आहे का ज्यामुळे मला, माझ्या कुटुंबाला किंवा माझ्या देशाला लाज वाटेल? मग आयुष्याच्या या टप्प्यावर मी सर्वकाही साध्य केलेलं असताना आता काहीही का करू? माझ्या आणि माझ्या चाहत्यांमध्ये एक , पवित्र आणि अतूट नातं आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही जे पाहिलं, तो माझ्या चाहत्यांचा प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. माझे चाहते माझ्यावर खूप प्रेम करतात. काहीजण हात मिळवतात, कोणी हातावर किस करतं… त्यामुळे अशा गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नाही".
उदित नारायण म्हणाले, "मला आजवर फिल्मफेअर, राष्ट्रीय, पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार मिळाले आहेत. मला आता लता मंगेशकर यांच्यासारखा भारतरत्न मिळवायची इच्छा आहे. माझ्या पिढीतील गायकांमध्ये मी सर्वांचा आवडता गायक आहे हे तुम्हाला माहितीये का? माझ्या पिढीतील गायकांमध्ये सर्वाधिक गाणी मी गायली आहेत. माझ्याकडे सरस्वती मातेचा आशीर्वाद आहे. त्यामुळे इतर अयशस्वी होताना आनंद मानणाऱ्या लोकांची पर्वा मी का करु?"