अभिनेत्री तुनिशा शर्माने 24 डिसेंबर रोजी आत्महत्या करून या जगाचा निरोप घेतला. तुनिशा शर्मा प्रकरणातील शीझान खान हा मुख्य आरोपी असून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याचबरोबर पोलीसही या प्रकरणाचा वेगाने तपास करत आहेत. तुनिशाच्या मृत्यूवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि अनेक सेलिब्रिटींनी यावर भाष्य केलं आहे. याच दरम्यान आता उर्फी जावेदनेही (Urfi Javed) यावर प्रतिक्रिया दिली आहे. उर्फीने तिच्या पोस्टमध्ये मुलींना स्ट्राँग राहण्याचा संदेश दिला आहे. उर्फी जावेदची इन्स्टा स्टोरी जोरदार व्हायरल होत आहे.
तुनिशा शर्मा प्रकरणावर उर्फी जावेदने इन्स्टा स्टोरीवर लिहिले, "तो (शीझान) चुकीचा असू शकतो, त्याने तिची (तुनिशा) फसवणूक केली असेल, पण तिच्या मृत्यूसाठी आपण त्याला जबाबदार धरू शकत नाही. ज्याला तुमच्यासोबत राहायचे नाही, अशा व्यक्तीला तुम्ही तुमच्यासोबत राहण्यास भाग पाडू शकत नाही. मुलींनो, कोणीही नाही, मी पुन्हा पुन्हा सांगते - कोणीही नाही... तुमचे मौल्यवान जीवन वाया घालवण्यास पात्र नाही."
"स्वतःवर प्रेम करण्याचा प्रयत्न करा...."
उर्फीने आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये पुढे लिहिले की, 'कधी कधी असे वाटते की हा जगाचा अंत आहे परंतु माझ्यावर विश्वास ठेवा असे नाही. तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा विचार करा किंवा स्वतःवर थोडे अधिक प्रेम करण्याचा प्रयत्न करा. स्वतःचे हिरो व्हा... स्वतःला थोडा वेळ द्या... आत्महत्या करूनही वेदना संपत नाहीत, जे मागे राहतात त्यांच्या वेदना आणखीनच वाढतात. उर्फीच्या पोस्टवरून तिला ट्रोल केले जात असून अनेक ट्रोलने तिच्या धर्मावरही निशाणा साधला आहे.
तुनिशाने 24 डिसेंबरला तिच्या शोच्या सेटवर आत्महत्या केली होती. तुनिशाचा सहकलाकार आणि माजी प्रियकर शीझान खानला रविवारी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. सध्या चार दिवस तो पोलीस कोठडीत आहे. वसईच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शीझानने तपास अधिकाऱ्यांना सांगितले होते की, तुनिशासोबत त्याचे तीन महिन्यांपासून संबंध होते आणि त्यानंतर काही गोष्टी बदलल्या. दोघांच्या वयातील फरकही त्याने सांगितला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"