Join us

'त्याची लायकी काय आहे'?; संतापलेल्या उर्फीने चारचौघात काढली रणबीरची इज्जत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 12:52 PM

Urfi javed: रणबीर कपूरने काही दिवसांपूर्वी उर्फीच्या फॅशनसेन्सची खिल्ली उडवली होती. त्यावर आता तिने सडेतोड उत्तर दिलं आहे.

चित्रविचित्र फॅशन करुन बिनधास्तपणे वावरणारी उर्फी जावेद (urfi javed) कोणासाठीही नवीन नाही. उर्फी कायम तिच्या आऊट ऑफ द बॉक्स फॅशनमुळे चर्चेत येत असते. कधी गोणपाट, सेप्टिपीन, फोटो असं काहीही वापरुन उर्फीने आतापर्यंत तिचे आऊटफिट तयार केले आहेत. त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत कायम तिची चर्चा होत असते. विशेष म्हणजे करीना कपूर-खानने उर्फीच्या बोल्डनेसचं कौतुक केलं. तर, दुसरीकडे अभिनेता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) उर्फीची खिल्ली उडवली. त्यावर आता उर्फीने रागाच्या भरात रणबीरला सुनावलं आहे.

काही दिवसांपूर्वीच रणबीरने उर्फीच्या फॅशनसेन्सची खिल्ली उडवली होती. उर्फी करते ती फॅशन नाहीये. मला अजिबात आवडत नाही, असं त्याने म्हटलं होतं. त्याच्या या प्रतिक्रियेवर उर्फीने आता तिचं उत्तरं दिलं आहे. एका मुलाखतीत तिने रणबीरवर निशाणा साधला आहे.

"करीना कपूरने माझं कौतुक केलं यातच सगळं आलं. तिचं कौतुक ऐकून मी काही तरी साध्य केलंय असं मला वाटतं. आणि, खड्ड्यात गेला तो रणबीर कपूर. त्याची लायकी काय आहे", असा थेट सवाल विचारत उर्फीने रणबीरप्रतीची नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रणबीरने अभिनेत्री करीना कपूर-खानच्या चॅट शो मध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीमध्ये करीनाने रणबीरला उर्फीच्या फॅशनसेन्सविषय़ी प्रश्न विचारला होता. त्यावर, ''ती जी काही फॅशन करते त्याचा मी चाहता नाहीये. आज आपण अशा जगात जगतोय जिथे तुम्ही स्वत:विषयी कॉन्फिडंट असाल तर ठीक आहे. पण, तिचा फॅशनसेन्स म्हणजे बॅड टेस्ट''.

टॅग्स :उर्फी जावेदरणबीर कपूरबॉलिवूडसेलिब्रिटी