Join us

"रणवीर-दीपिकाच्या लेकीचे फोटो काढून लोकांकडून पैसे घेईन", उर्फी जावेदचं वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 16:23 IST

उर्फी तिचे अतरंगी कपडे किंवा फॅशनमुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. उर्फीने दीपिका-रणवीरच्या लेकीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण नुकतीच आई झाली आहे. दीपिकाने ८ सप्टेंबरला गोंडस लेकीला जन्म दिला. दीपिका आणि रणवीर यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाल्याने चाहतेही आनंदी झाले. दीपवीरला चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनीही शुभेच्छा दिल्या. पण, उर्फी जावेदने मात्र दीपिका आणि रणवीरच्या लेकीबद्दल अजब वक्तव्य केलं आहे. 

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण, यावेळेस उर्फी तिचे अतरंगी कपडे किंवा फॅशनमुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. उर्फीने दीपिका-रणवीरच्या लेकीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आहे. इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन उर्फीचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीला "कोणत्या बॉलिवूड सेलिब्रिटीचं अकाऊंट २४ तासांसाठी तुला चोरायला आवडेल?" असा प्रश्न विचारला जातो. याचं उत्तर देताना ती रणवीर सिंगचं नाव घेते. 

उर्फी म्हणते, "मला रणवीर सिंग आवडतो. त्यामुळे मला त्याचं अकाऊंट चोरायला आवडेल. अजून पर्यंत रणवीरने त्याच्या लेकीचा चेहरा दाखवलेला नाही. मी त्याच्या लेकीचा फोटो काढून ते लोकांना दाखवण्यासाठी लोकांकडून पैसे घेईन". उर्फीने दीपिका-रणवीरच्या लेकीबद्दल केलेलं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे.

दिवाळीच्या मुहुर्तावर दीपिका-रणवीरने लाडक्या लेकीची छोटीशी झलक दाखवत तिच्या नावाबाबतही खुलासा केला. दीपिका-रणवीरने लेकीचं नाव दुआ असं ठेवलं आहे. २०१८ साली दीपिका आणि रणवीरने लग्न केलं होतं. लग्नानंतर ६ वर्षांनी ते आईबाबा झाले आहेत. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या सिंघम अगेन सिनेमात दीपिका आणि रणवीरने एकत्र काम केलं आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दीपिका गरोदर होती. गरोदर असताना दीपिकाने सिनेमातील अॅक्शन सीन्स शूट केले होते.

टॅग्स :रणवीर सिंगदीपिका पादुकोणउर्फी जावेद