Join us

अटकेच्या प्रकरणानंतर उर्फी जावेद पोहोचली अमृतसरला, सुवर्ण मंदिराचं घेतलं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 15:36 IST

उर्फीचा हा लुक बघून नेटकरी तर शॉक झालेत.

दरदिवशी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असणारी उर्फी जावेदची (Urfi Javed) आता वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. काही दिवसांपूर्वीच तिला अटक झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नंतर हा प्रमोशनल व्हिडिओ असल्याचं समोर आलं होतं. उर्फीने स्वत:च ते स्पष्ट केलं. यावर मुंबई पोलिसांनी कारवाई होईल असं ट्वीट केलं होतं. यानंतर उर्फी दुबईला पळाली होती. आता नुकतंच तिने अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

उर्फी जावेदअमृतसरच्या प्रसिद्ध गोल्डन टेम्पलमध्ये पोहोचली. याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत उर्फी तिच्या नेहमीच्या फॅशनपेक्षा फारच वेगळ्या स्टाईलमध्ये दिसली. तिने गुलाबी रंगाचा सलवार सूट घातला आहे. यावेळी तिने मंदिरात बसून भजन कीर्तनही ऐकलं. तिच्यासोबत तिची छोटी बहीण डॉली जावेदही होती.  तिने फोटोंना 'वाहेगुरु' असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. 

उर्फीचा हा लुक बघून नेटकरी तर शॉक झालेत. वेगवेगळ्या कमेंट फोटोवर आल्या आहेत. 'ही उर्फीच आहे की कोणी दुसरीच','तू असेही कपडे घालतेस का?' अशा कमेंट पोस्टवर आल्या आहेत.

टॅग्स :उर्फी जावेदअमृतसरमंदिरसोशल मीडिया