Join us

उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 13:03 IST

तृप्तीच्या त्या डान्सवरुन आता उर्फी जावेदनेही खिल्ली उडवली आहे.

तृप्ती डिमरी (Tripti Dimri) 'ॲनिमल' सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री. या सिनेमानंतर तिचं नशीबच फळफळलं. नुकतेच तिचे तीन सिनेमे रिलीज झालेत. ॲनिमल मध्ये न्यूड सीन दिल्याने तिची खूपच चर्चा रंगली होती. दरम्यान तिला बऱ्याच टीकेचाही सामना करावा लागला. तसंच तिला एका डान्सवरुन ट्रोल करण्यात आलं. तृप्तीच्या त्या डान्सवरुन आता उर्फी जावेदनेही (Urfi Javed) खिल्ली उडवली आहे.

तृप्ती डिमरी आणि विकी कौशलचा 'बॅड न्यूज' सिनेमा काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता. यातील 'मेरे मेहबूब' गाण्यात तिने केलेला डान्स अनेकांना आवडला नाही. यावर नुकतंच इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत उर्फी म्हणाली, "तृप्ती खूप चांगली अभिनेत्री आहे. ती अतिशय सुंदर आहे. पण डान्सबाबतीत ती मागे राहिली. तिने केलेले डान्स मूव्ह्ज खूपच वाईट आहेत. का तृप्ती का? इतकी गोड मुलगी, इतकी छान अभिनेत्री पण तिने स्वत:चं किती नुकसान केलं."

उर्फीच्या या स्टेटमेंटवर युझर्सनेही प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले, 'उर्फी खरं बोलत आहे, तृप्तीला डान्स करताच येत नाही पण तरी ती मला आवडते'. आणखी एकाने लिहिले, 'मी पहिल्यांदाच उर्फीशी सहमत आहे','ती अभिनेत्री आहे डान्सर नाही'.

टॅग्स :उर्फी जावेदतृप्ती डिमरीबॉलिवूडनृत्यसोशल मीडिया