Join us

उर्फी जावेदचा नवा 'अवतार' बघितलात का? कंगव्यापासून बनवला ड्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 19:54 IST

उर्फीने कंगव्यापासून एक ड्रेस बनवला आहे. जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. 

उर्फी जावेद हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेले एक नाव आहे. उर्फीसाठी तिच्या कपड्यांवरून प्रसिद्धी मिळवणे ही काही नवीन गोष्ट नाही, आता उर्फी पुन्हा एकदा विचित्र ड्रेसमध्ये दिसली. आता उर्फीने कंगव्यापासून एक ड्रेस बनवला आहे. जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. 

उर्फीचा नवीन व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. यामध्ये तिने कंगव्यापासून बनवलेला ड्रेस घातला आहे. उर्फीच्या याही स्टाईलवर नेटकऱ्यांनी हसू आवरलेलं नाही. 'तरीच म्हटलं आमच्या घरातील कंगवे गेले कुठे' अशी कमेंट एकाने केली आहे. 'घरातील वस्तू तरी सोड' अशा कमेंट्सही व्हिडीओवर आल्या आहेत. एका युजरने तर उर्फीच्या फॅशन हॅक्सची तुलना  पॅरिस फॅशन वीकशी केली आहे.

उर्फी  स्वत:च कपडे डिझाईन करते आणि ते घालते. तिच्या फॅशन सेन्समुळे तिच्यावर बऱ्याच जणांनी टीकाही केली. मात्र उर्फी काही तिची फॅशन बदलत नाही. उर्फी जावेदने 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'कसौटी जिंदगी की 2' आणि 'बेपन्ना' सारख्या लोकप्रिय शोमध्ये काम केले आहे. आहे. बिग बॉस ओटीटी सीझन 1 मधून ती प्रसिद्धीच्या झोतात आली. 

टॅग्स :उर्फी जावेदबॉलिवूड