Join us

रणवीर सिंगच्या ‘83’ मध्ये ‘उरी’चा हा अभिनेता साकारणार रवी शास्त्रींची भूमिका!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 10:09 AM

रणवीर सिंगचा गत आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘गली बॉय’ हा चित्रपट एकीकडे धूम करतोय. दुसरीकडे त्याचा 1983 क्रिकेट वर्ल्ड कप विजेत्या टीमवर येऊ घातलेला चित्रपटही चर्चेत आहेत.

ठळक मुद्देकबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता.

रणवीर सिंगचा गत आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘गली बॉय’ हा चित्रपट एकीकडे बॉक्सआॅफिसवर धूम करतोय. दुसरीकडे त्याचा 1983 क्रिकेट वर्ल्ड कप विजेत्या टीमवर येऊ घातलेला चित्रपटही चर्चेत आहेत. ‘83’ या चित्रपटात रणवीर भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार कपिल देव याची भूमिका साकारताना दिसणार आहे. तूर्तास रणवीरने या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. शिवाय चित्रपटाची स्टारकास्ट निवडण्याची प्रक्रियाही सुरू आहे. आता या चित्रपटात रवी शास्त्रीची भूमिका कोण साकारणार तेही स्पष्ट झाले आहे.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ फेम अभिनेता धैर्य कारवा या चित्रपटात रवी शास्त्रीची भूमिका साकारणार असल्याचे कळतेय. ‘उरी’मध्ये धैर्यने सरताज सिंह चंदोक नामक पात्र साकारले होते. त्याच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. तूर्तास धैर्य स्वत:ला रवी शास्त्रीच्या भूमिकेत बसवण्यासाठी जीवतोड मेहनत घेतोय.

तुम्हाला ठाऊक आहेच की,या सिनेमात रणवीर सिंगकपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. तर माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा वठविणार आहे.   साहिल खट्टर  माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी याची भूमिका साकारणार आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. यात चिराग पाटील वडील संदीप पाटील यांची भूमिका साकारणार आहे. तर मान सिंग यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी दिसणार आहे. क्रिकेटर सुनील गावस्कर यांची भूमिका अभिनेता ताहिर भसीन साकारणार आहे. कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. सिनेमाच्या शूटिंग आधी कलाकारांसाठी मोहालीमध्ये एक बूट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. एप्रिलमध्ये होणारे हे बूट कॅम्प जवळपास पंधरा दिवस चालणार आहे. यात कपिल देव, यशपाल शर्मा, मदन लाल आणि अन्य क्रिकेटर सहभागी होणार आहेत. या कॅम्पमध्ये क्रिकेटर्स सिनेमातील कलाकारांना क्रिकेट शिकवणार आहे.    

टॅग्स :रणवीर सिंग८३ सिनेमाकपिल देवरवी शास्त्री