‘बेवफा ब्युटी’ बनून परततेयं उर्मिला मातोंडकर! इरफान खानच्या ‘ब्लॅकमेल’मध्ये केले आयटम साँग!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 06:04 AM2018-03-22T06:04:49+5:302018-03-22T11:34:49+5:30
अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुन्हा एकदा चाहत्यांना वेड लावण्यासाठी येतेय. होय, सुमारे १० वर्षांनंतर उर्मिला मोठ्या पडद्यावर कमबॅक करतेय.
अ ेक ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुन्हा एकदा चाहत्यांना वेड लावण्यासाठी येतेय. होय, सुमारे १० वर्षांनंतर उर्मिला मोठ्या पडद्यावर कमबॅक करतेय. ‘ब्लॅकमेल’ या इरफान खान स्टारर चित्रपटातील ‘बेवफा ब्युटी’ या गाण्यावर उर्मिला थिरकताना दिसणार आहे.
‘ब्लॅकमेल’चे दिग्दर्शक अभिनव देव यांनी या गाण्यात उर्मिलाला घेण्यामागचे कारण सांगितले. ‘आमच्या चित्रपटात तसे पाहता कुठलेच गाणे नव्हते. पण भूषणसोबत चित्रपटावर चर्चा सुरु असताना, ‘ब्लॅकमेल’मध्ये गाणे असावे, असे त्यांचे मत पडले. मला या चित्रपटात कुठलेही आयटम साँग नको होते. मी अमिताभ व अमित यांना माझी कल्पना सांगितली. मला असे एक गाणे हवे, जे जुन्या दिवसांची आठवण करून देईल. हेच एक कारण होते की, या गाण्यासाठी आम्ही उर्मिलाची निवड केली. उर्मिला आयटम गर्ल नाही तर एक स्टार आहे. आम्हाला एक परफॉर्मर हवी होती, जिची स्वत:ची एक ओळख असेल. मी एका योग्य अभिनेत्रीची निवड केली, याचा मला विश्वास आहे. या गाण्यात ती अगदी फिट बसते, असे अभिनव यांनी सांगितले.
गाण्याबद्दल सांगायचे तर हे गाणे पावनी पांडेने स्वरबद्ध केले आहे. पावनीने याआधी ‘रईस’मधील ‘लैला मैं लैला’ हे गाणे गात लोकांची मने जिंकली होती. ‘बेवफा ब्युटी’ला अमित त्रिवेदीने कम्पोज केले आहे तर अमिताभ भट्टाचार्यने लिहिले आहे.
ALSO READ : अशी आहे ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकरची लव्ह स्टोरी...!
रामगोपाल वर्मांच्या ‘रंगीला’या सिनेमामुळे उर्मिलाला बॉलिवूडमध्ये ‘रंगीला गर्ल’च्या नावाने ओळखले जाऊ लागले. उर्मिलाने आपल्या करिअरमध्ये ‘चमत्कार’, ‘रंगीला’, ‘जुदाई’, ‘सत्या’, ‘मस्त’ , ‘खूबसूरत’, ‘प्यार तूने क्या किया’, ‘भूत’ यांसारखे अनेक हिट सिनेमे दिलेत. २००८मध्ये हिमेश रेशमियाच्या ‘कर्ज’या सिनेमात ती अखेरची झळकली होती. २००५ ते २००८ याकाळात तिने काही सिनेमांमध्ये लहानसहान भूमिका साकारल्या होत्या. याचदरम्यान उर्मिलाने आपला मोर्चा मराठी सिनेसृष्टीकडे वळवला. सुजय डहाके दिग्दर्शित ‘आजोबा’ या सिनेमात ती दिसली. या सिनेमाची बरीच चर्चा झाली होती. मात्र या सिनेमाला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही.२०१६ मध्ये उर्मिलाने वयाच्या ४२ व्या वर्षी स्वत:पेक्षा ९ वर्षे लहान असलेल्या मोहसीन मीर अख्तरसोबत लग्न केले.