Join us

४७ वर्षांची झाली उर्मिला मातोंडकर, 'आँटी' बोलणाऱ्यांना अभिनेत्रीनं दिलं चांगलंच प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 13:32 IST

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज ४७वा वाढदिवस साजरा करते आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज ४७वा वाढदिवस साजरा करते आहे. उर्मिला मातोंडकरचे म्हणणे आहे की जेव्हा लोक मला आँटी म्हणून ट्रोल करतात तेव्हा माझ्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही.. ती म्हणाली की, मी तुम्हाला हात जोडून सांगू इच्छिते की जर तुम्हाला मला या माध्यमातून त्रास देत असाल तर मला त्याने अजिबात त्रास होत नाही. मी विचार करते की वाढत्या वयासोबत आपल्या जीवनात खूप काही बदल झाले आहेत आणि तुम्ही समृद्ध झाले आहेत. 

उर्मिला मातोंडकर म्हणाली की, जीवनात काळासोबत जे लोक चांगल्या गोष्टी शिकत नाहीत, ते दुःखी होऊ शकतात. मी कोणावर टीका किंवा जजमेंट देत नाही. मी प्रामाणिकपणे सांगते की मी जीवनात नेहमीच आपले काम शिकण्याचा प्रयत्न केला आहे, जे माझ्यासमोर आले आहे. 

वाढदिवसाच्या निमित्ताने उर्मिला मातोंडकरने गरीबांना गरजेच्या सामानाचे वाटप करण्याची योजना आखली आहे. इतकेच नाही तर ती चाहत्यांसोबत इंस्टाग्राम आणि फेसबुकवर लाइव्ह जोडणार आहे. उर्मिला सांगते की, वाढदिवसाच्या दिवशी कोणते मोठे सेलिब्रेशन करायला फार आवडत नाही. ती म्हणाली की, माझे संगोपन असे झाले आहे की मी वाढदिवसा सारख्या गोष्टींमुळे जास्त उत्साही नाही होत.

ती पुढे म्हणाली की, या ऐवजी मी दुसऱ्यांच्या वाढदिवसाला जास्त उत्साही असते आणि त्यांच्यासाठी प्लान करते. बालपणापासून मी आणि माझ्या भावाच्या मनात समाजासाठी काही तरी करण्याची भावना राहिली आहे. त्यामुळे वाढदिवसादिवशी दान करण्याची परंपरा आधीपासून चालत आली आहे. महाराष्ट्रातील बाबा आमटे यांच्या आनंदवन सारख्या संस्थांना आम्ही डोनेट करतो. आपल्यापेक्षा त्या लोकांना याची गरज आहे.

बालपणी वाढदिवसासारख्या गोष्टी होत्या, मात्र सिनेइंडस्ट्रीत आल्यानंतर वेळ मिळाला नाही. चित्रपटसृष्टीत आल्यानंतर वेळ मिळाला नाही. दिवाळी, न्यू इअर आणि अशा दिवशी मी खूप काम केले आहे. आज माझ्यासाठी आनंदाची बाब आहे जेव्हा दुसरे लोक मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. माझी गाणी लावून त्यांना उजाळा देतात.

टॅग्स :उर्मिला मातोंडकर