या कारणामुळे उर्मिला मातोंडकर गेल्या दहा वर्षांपासून इंडस्ट्रीमधून होती गायब!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 1:13 PM
मासूम गर्ल उर्मिला मातोंडकर नुकतीच ‘ब्लॅकमेल’ या चित्रपटात डान्स नंबर करताना बघावयास मिळाली. तब्बल दहा वर्षांनंतर ती परतली. पण एवढा काळ ती इंडस्ट्रीतून का गायब होती, त्याचा तिने नुकताच खुलासा केला.
‘मासूम गर्ल’ उर्मिला मातोंडकर गेल्या दहा वर्षांपासून इंडस्ट्रीमधून जणू काही गायब झाली आहे. अखेरीस तिला हिमेश रेशमियाच्या ‘कर्ज’ या चित्रपटात बघण्यात आले होते. त्यानंतर उर्मिला २०१८ मध्ये आलेल्या इरफान खानच्या ‘ब्लॅकमेल’मध्ये स्पेशल डान्स नंबर करताना दिसली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने याविषयीचा खुलासा केला की, अखेर ती गेल्या दहा वर्षांपासून चित्रपटांमध्ये का झळकली नाही? उर्मिलाने चित्रपटांपासून दूर जाण्याचे कारण सांगताना म्हटले की, ‘मी अॅक्शनला खूप मिस करीत आहे. त्याचबरोबर एखादी चांगली स्क्रिप्ट न मिळणेही एक कारण आहे. जेव्हा उर्मिलाला तिच्या आगामी चित्रपटाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने म्हटले की, ‘जर चांगली स्क्रिप्ट मिळाली तर त्यावर मी नक्कीच विचार करणार.’ ती तिच्या करिअरबद्दल आनंदी आहे काय? असे जेव्हा तिला विचारण्यात आले तेव्हा तिने म्हटले की, ‘मी स्वत:ला नेहमीच आश्वस्त करीत असते की, मी माझ्या करिअरमध्ये बेस्ट दिले आहे. त्याचबरोबर भविष्यात बेस्ट देण्याचा माझा प्रयत्न असेल. खरं तर इतके वर्षे इंडस्ट्रीत काम केल्यानंतर रिझल्ट लोकांसमोर आहेच, त्यामुळे वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही. यावेळी उर्मिलाने हेदेखील सांगितले की, असे फारच कमी कलाकार आहेत, ज्यांना माझ्यासारखे भाग्य लाभले आहे. आयुष्य आणि करिअरविषयी आनंद व्यक्त करताना उर्मिलाने म्हटले की, जेव्हा तुमच्या आयुष्यात एक रिकामे स्थान निर्माण होते तेव्हा एक कलाकार म्हणून तुम्ही भरभराटीचा काळ मिस करता. जर तुमचे आयुष्य आनंदाने भरलेले असते, तेव्हा तुमच्याकडे मिस करण्यासारखे काहीही नसते. प्रत्येक कलाकाराला कॅमेºयासमोर येणे पसंत असते. खरं तर ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. दरम्यान, उर्मिलाने आपल्या करिअरची सुरुवात एक बालकलाकार म्हणून केली होती. तिने ‘रंगिला, जुदाई, सत्या, भूत, पिंजर’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.