Join us  

बाथरुम व्हिडिओ लीक, उर्वशीने मॅनेजरला धरलं धारेवर; आता दोघांचं संभाषणही झालं व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 2:23 PM

सोशल मीडियावर सर्वच एंटरटेन्मेंट पेजवर उर्वशी आणि तिच्या मॅनेजरचं संभाषण व्हायरल होतंय.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सध्या एका कॉन्ट्रोव्हर्सीत अडकली आहे. कालच तिचा बाथरुममध्ये कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर तिने फोनरुन तिच्या मॅनेजरला चांगलंच धारेवर धरलं. आता उर्वशी आणि मॅनेजरचं संभाषणच लीक झालं आहे. यामुळे पुन्हा इंटरनेटवर खळबळ माजली आहे. उर्वशीचा हाल पब्लिसिटी स्टंट असल्याची दाट शक्यता आहे.

सोशल मीडियावर सर्वच एंटरटेन्मेंट पेजवर उर्वशी आणि तिच्या मॅनेजरचं संभाषण व्हायरल होतंय. यात ती म्हणते, 'तुम्ही व्हिडिओ पाहिला?' मला कळत नाहीए हे सगळं काय चालू आहे. या गोष्टी बाहेर कशा येत आहेत. मला लगेच त्यांच्याशी बोलावं लागेल.' यावर मॅनेजर तिला धीर देण्याचा प्रयत्न करतो. तसंच व्हिडिओ सोशल मीडियावर काढून टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे असंही सांगतो. तू एकदा भारतात आलीस की यावर बोलू असंही तो म्हणतो.

हे संभाषण ऐकून नेटकऱ्यांनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याच्याच कमेंट केल्या आहेत. 'इथेही अॅक्टिंग जमली नाही' असं म्हणत तिची खिल्लीही उडवली आहे. या प्रकारावर अद्याप उर्वशीच्या टीमकडून कोणतंही स्पष्टीकरण आलेले नाही. 

 30 वर्षीय उर्वशीने सनी देओलच्या 'सिंग साहब द ग्रेट' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ती 'सनम रे','ग्रेट ग्रँड मस्ती' या सिनेमांमध्येही झळकली. नुकताच 'जेएनयू' सिनेमा रिलीज झाला. आता ती आगामी 'ब्लॅक रोज' या तेलुगु आणि 'दिल है ग्रे' या हिंदी सिनेमात दिसणार आहे.

टॅग्स :उर्वशी रौतेलासोशल मीडियाबॉलिवूड