बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या चित्रपटांपेक्षा अफेअरच्या बातम्यांमुळेच चर्चेत असते. विशेष म्हणजे, बॉलिवूड अभिनेत्यांऐवजी क्रिकेटपटूंसोबत तिचे नाव जोडले जाते. मध्यंतरी उर्वशी क्रिकेटपटू हार्दिक पांड्याला डेट करत असल्याची चर्चा होती. पण आता मात्र उर्वशी हार्दिकला सोडून रिषभ पंतच्या प्रेमात पडल्याची चर्चा आहे. आता उर्वशी रात्री उशीरा रिषभ पंतसोबत दिसल्याचा दावा मीडियाने आहे.
चर्चा खरी मानाल तर गत 10 तारखेला रात्री 11 वाजता उर्वशी रिषभ पंतसोबत डिनर डेटवर जाताना स्पॉट झाली. जुहूच्या एका हॉटेलात दोघेही डिनर डेट एन्जॉय करताना दिसले. टी-20 मॅचच्या आधी झालेल्या या डिनर डेटने अनेकांच्या भुवया उंचावल्या नसतील तर नवल.आता ही डिनर डेट दुस-या, तिस-यात बदलते की, निव्वळ अफवा सिद्ध होते, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.
यापूर्वी उर्वशी व हार्दिक पांड्या रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. हार्दिक व उर्वशीची ओळख 2018 मध्ये एका पार्टीत झाली होती. यानंतर दोघांत मैत्री झाली आणि नंतर दोघांच्या भेटी-गाठी सुरु झाल्या होत्या. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा यादरम्यान पसरली होती. मात्र या चर्चेदरम्यान उर्वशीने सोशल मीडियावर पोस्ट लिहून अशा अफवा पसरवणे बंद करा, मलाही घरच्यांना उत्तर द्यावे लागते, अशी विनंती केली होती. आता रितष पंतसोबतच्या अफेअरच्या बातम्यांवर उर्वशी कशी रिअॅक्ट होते, ते पाहूच.
बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी उर्वशी दीर्घकाळापासून इंडस्ट्रीत पाय रोवण्याचे प्रयत्न करतेय. पण अद्याप तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. नाही म्हणायला तिला चित्रपट मिळतात, पण या चित्रपटातील तिचे बोल्ड सीन्स तेवढेच चर्चेत राहतात. नुकताच तिचा ‘पागलपंती’ हा सिनेमा रिलीज झाला.