Join us

कोरोना परिस्थितीत उर्वशी रौतेलाही मदतीसाठी उतरली मैदानात, गरजूंना करते अन्नदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 7:02 PM

याआधीही उर्वशी रौतेलाने डान्स मास्टर्सक्लासच्या माध्यमातून ती १८ मिलियन लोकांशी जोडली गेली होती. त्यातून तिने ५ कोटीची रक्कम ही जमवली. जे तिने कोरोना पिडीतांसाठी दान केली होती.

एरव्ही महागड्या फॅशनसाठी जास्त चर्चेत असणारी अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे सोशल मीडियावर चाहते भरभरुन कौतुक करत आहेत. त्याला कारणही तसे खासच आहे. कारण कोरोना परिस्थितीत घरात न बसता मदतीसाठी आता ती थेट मैदानात उतरली आहे. उर्वशीने देखील समाजाच्या तळागाळात पोहोचून काम करण्यासाठी नुकतीच एका फाउंडेशनची सुरुवात केली आहे. या फाऊंडेशनच्या मदतीने स्वत: रस्त्यावर उतरून आता मदत करत आहे.

जमेल तशी मदत ती तिच्या फाऊंडेशनच्या साहाय्याने  करणार आहे. याची सुरुवातही तिने केली आहे. कोरोना काळात अनेकांना दोन वेळचे जेवणही मिळत नाही.अशा गरजुंना स्वतः उर्वशीने अन्न वाटप केले आहे.प्रत्येकाने जमेल तशी मदत करत राहणे असे आवाहनही तिने इतरांना केले आहे. 

याआधीही उर्वशी रौतेलाने ५ कोटींची मदत केली होती. ज्या लोकांना डान्स शिकण्याची इच्छा आहे आणि वजन देखील कमी करायचे आहे अशा सर्वांना डान्स शिकवला होता, ज्यामध्ये वेगवेगळे डान्स फॉर्म तिने दाखवले होते. डान्स मास्टर्सक्लासच्या माध्यमातून ती १८ मिलियन लोकांशी जोडली गेली होती. त्यातून तिने ५ कोटीची रक्कम ही जमवली. जे तिने कोरोना पिडीतांसाठी दान केली होती. इतकेच नाही तर उत्तराखंडसाठी तिने २७ ऑक्सीजन कन्‍सन्‍ट्रेटर्सची मदत केली होती.

सध्या देशभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. रुग्णसंख्या वाढत असून बेड्स , ऑक्सिजन मिळणही अवघड होऊन बसलं आहे. अशातच अनेकजन पुढे येऊन मदतीचा हात पुढे करत आहेत. त्यात काही बॉलिवूड सेलिब्रिटीजचाही  समावेश आहे. या कठीण काळात त्यांनी मोठी मदत केली आहे. सोनू सूद, सलमान खान, सारा अली खान, अजय देवगण, अमिताभ बच्चन, जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर यासारखे अनेक सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

टॅग्स :उर्वशी रौतेलामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस