‘हेट स्टोरी4’मध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना रिझवणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला चित्रपटांत फार कमाल दाखवू शकली नाही. पण याऊपर चर्चेत कसे राहायचे हे उर्वशीला चांगलेच कळते. सोशल मीडियावर ती कमालीची अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर स्वत:चे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करून ती सतत चर्चेत असते. पण आता याच हॉट उर्वशीची चर्चा होतेय ती एका वेगळ्या आणि तितक्याच सुंदर कारणासाठी. होय, बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींप्रमाणेच उर्वशीही कोरोनाच्या संकटात मदतीसाठी पुढे सरसावली आहे.
होय, उर्वशीने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर 5 कोटी रूपयांची मदत केली. विशेष म्हणजे एका डान्स मास्टरक्लासच्या माध्यमातून तिने ही रक्कम उभी केली आणि नंतर गरजुंना दान केली.
२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले.‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. भाग जानी, सनम रे अशा चित्रपटातही ती झळकली.