Urvashi Rautela Fashion blunder : ‘हेट स्टोरी 4’मध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना रिझवणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) चित्रपटांत फार कमाल दाखवू शकली नाही. पण याऊपर चर्चेत कसे राहायचे हे उर्वशीला चांगलेच कळते. सोशल मीडियावर ती कमालीची अॅक्टिव्ह आहे. आपल्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या मात्र एका वेगळाच कारणाने चर्चेत आहे.
होय, उर्वशीने प्लेनच्या बिझनेस क्लासमध्ये क्लिक केलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत आणि हे फोटो पाहून लोकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. कारण काय तर तिची रिप्ड जीन्स.
रिप्ड जीन्स आणि लाइट ग्लिटरिंग टॉपमध्ये उर्वशी कमालीची सुंदर व स्टायलिश दिसतेय. मोकळे केस आणि डोळ्यांवर गॉगल आणि ग्लॉसी मेकअप असा तिचा लुक आहे. अनेकांनी तिच्या या लुकचं कौतुक केलंय.
पण काहींना तिची रिप्ड जीन्स चांगलीच खटकली आणि मग काय, उर्वशी ट्रोल झाली. ‘अगं ती जीन्स खालून फाटतेय बघ,’ अशी कमेंट एका युजरने केली. ‘अरे ही कोणती फॅशन आहे?’, असा प्रश्न एका युजरने केला आहे.
एका युजरने तर आमच्याकडे खूप सारे फाटलेले कपडे आहेत, तुझ्या कामी येतील, असं म्हणत तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. काहींनी तिची तुलना उर्फी जावेदशी केली.
रिप्ड जीन्स घालून उर्वशीने एक रिल व्हिडीओ देखील शेअर केला आहे. यात ती ‘द लीजेंड’ या चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना दिसतेय. लवकरच तिचा ‘द लीजेंड’ हा सिनेमा रिलीज होतोय. याशिवाय ‘दिल है ग्रे’ आणि ‘द ब्लॅक रोज’ या चित्रपटातही ती दिसणार आहे. बॉलिवूडमध्ये उर्वशी फार कमाल दाखवू शकली नाही. त्यामुळे तिने साऊथकडे मोर्चा वळवला. उर्वशी अखेरची ‘व्हर्जिन भानुप्रिया’ या चित्रपटात दिसली होती. पण हा चित्रपट फ्लॉप ठरला होता.