24 फेब्रुवारी हा दिवस युक्रेनसाठी खूप वाईट बनला आहे. रशियाने भल्या पहाटे ५ वाजता युक्रेनवर हल्ला करत तीस वर्षांपूर्वी सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याचे दिलेले आश्वासन मोडले आहे. प्रचंड महत्वाकांक्षी असलेल्या पुतिन यांनी अमेरिका आणि नाटोसारख्या संघटनांना हादरवणारे डावपेच खेळत केवळ १४ तासांत निम्मा युक्रेन ताब्यात घेतला आहे. युद्धाच्या या वातावरणात लाखो परदेशी विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. भारताचेच १८ हजारहून अधिक नागरिक अडकले आहेत.
यातच बॉलिवूडची एक अभिनेत्री थोडक्यात सुटली आहे. दोन दिवसांपूर्वीच तिने युक्रेन सोडल्याने ती बचावली आहे. जर ती गेली नसती तर युद्धाच्या वातावरणात अडकली असती. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही युक्रेनमध्ये होती. तिचा उद्या, २५ फेब्रुवारीला वाढदिवस आहे. यामुळे ती दोन दिवस आधीच कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला पोहोचली आहे. युक्रेनमध्ये ती सिनेमाचे शुटिंग करत होती.
तामिळ चित्रपट 'द लेजेंड'चे युक्रेनमध्ये शुटिंग सुरु आहे. यासाठी उर्वशी युक्रेनमध्ये गेली होती. जर ती बाहेर पडली नसती तर तिथेच अडकली असती. या चित्रपटाद्वारे उर्वशी तामिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री करणार आहे. तीन दिवसांपूर्वीच तिने युक्रेनमधून एक व्हिडीओ इन्स्टावर पोस्ट केला होता.