Join us

OMG! उर्वशी रौतेलाने घातला चक्क सोन्याचा ड्रेस, किंमत वाचून डोळे फिरतील

By रूपाली मुधोळकर | Updated: November 4, 2020 17:29 IST

Video Viral : पाहाल तर थक्क व्हाल

ठळक मुद्देअलीकडे सिंगर नेहा कक्करच्या लग्नाला उर्वशीने हजेरी लावली होती. यावेळी तिने 55 लाखांचा लेहंगा घातला होता.

‘हेट स्टोरी4’मध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना रिझवणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला चित्रपटांत फार कमाल दाखवू शकली नाही. पण याऊपर चर्चेत कसे राहायचे हे उर्वशीला चांगलेच कळते. सोशल मीडियावर ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. आपल्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या वेगळाच कारणाने चर्चेत आहे. होय, बोल्ड आणि ग्लॅमरस भूमिकांसाठी ओळखल्या जाणा-या या बयेने किती महागडा ड्रेस घालावा तर 37 कोटी 34 लाख रूपयांचा. होय, तो सुद्धा सोन्याचा ड्रेस.

तर उर्वशी अलीकडे अरब फॅशन वीकमध्ये शो स्टॉपर म्हणून मिरवताना दिसली. या फॅशन वीकमध्ये शो स्टॉपर बनणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. अरब फॅशन वीक दरम्यान उर्वशीची एक शॉर्ट फिल्मही रिलीज झाली.

फर्न अमेटोच्या या शॉर्ट फिल्ममध्ये तिने ‘इजिप्तची राणी क्लिायोपेट्रा’ची व्यक्तिरेखा जिवंत केली आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये तिने 5 मिलियन डॉलरचा ड्रेस घातला. भारतीय चलनात सांगायचे तर 37 कोटी 34 लाख रूपयांपेक्षा अधिक किमतीचा ड्रेस तिने परिधान केला. यावर या सोन्याचे वर्क केले आहे. 

2011 मध्ये उर्वशीने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. याचवर्षी तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली.

 भाग जानी,  सनम रे अशा चित्रपटात ती दिसली. यानंतर  ग्रेट ग्रँड मस्ती  हा चित्रपट तिच्या झोळीत पडला. अलीकडे तिचा ‘वर्जिन भानुप्रिया’ हा सिनेमा रिलीज झाला होता.

नेहा कक्करच्या लग्नात घातला होता  55 लाखांचा लेहंगा

उर्वशी रौतेला तशी अनेकदा तिच्या स्टाईल व आऊटफिटमुळे चर्चेत असते. अलीकडे सिंगर नेहा कक्करच्या लग्नाला उर्वशीने हजेरी लावली होती. यावेळी तिने 55 लाखांचा लेहंगा घातला होता. तिच्या या लूकची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती.

टॅग्स :उर्वशी रौतेला