Urvashi Rautela : बॉलिवुड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत हे दोघेही प्रोफेशनल पेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत आहेत. कधी उर्वशीला तर कधी रिषभ पंतला चिडवण्याची एकही संधी चाहते सोडत नाहीत. उर्वशी रौतेला नुकतीच एका Event इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. दरम्यान तिने घातलेल्या ड्रेसवर एका नेटकऱ्याची कमेंट तुफान व्हायरल होत आहे.
मॉडेल, अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमी ग्लॅमरस अवतारात दिसते. देश विदेशातील अनेक इव्हेंट्स मध्ये ती सहभागी होते. दरम्यान फ्रान्स मधील एका इव्हेंटमध्ये उर्वशीने White Frock पांढऱ्या रंगाचा फ्रॉक परिधान केला होता. या फ्रॉक ला मोठा घेर असल्याचे दिसून येत आहे. या ड्रेसमध्ये ती सुंदर दिसतेय. मात्र फॅन्सला यातही गंमत सुचत आहे. उर्वशीने या फ्रॉकवरील रील सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. तर त्यावर एका युझरने कमेंट करत रिषभ पंतला यात ओढले आहे.
युझरने लिहिले, 'तुझ्या फ्रॉकमध्ये आमचे रिषभ भाऊ पूर्ण मावतील' अशी कमेंट केली आहे.
उर्वशी आणि रिषभ पंतमध्ये नेमके झाले काय?
उर्वशीनं एका मुलाखतीत रिषभ पंतचं नाव न घेता सांगितलं होतं की एकेकाळी एक व्यक्ती हॉटेलच्या लॉबीमध्ये माझी १०-१० तास वाट पाहात बसायचा. उर्वशीचा हाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रिषभ पंतनंही तिच्यावर टीका करत एक इन्स्टास्टोरी पोस्ट केली होती. रिषभनं उर्वशीचं नाव न घेता.. 'पीछा छोड दो बहन', असं म्हटलं होतं. दरम्यान, स्टोरी पोस्ट केल्याच्या काही मिनिटांनी रिषभनं ती डिलीट केली होती. पण दोघांमधील वाद अजूनही कायम आहेत.