ग्लॅमरस, उर्वशी रौतेला फिल्मफेअर रेड कार्पेटवर उतरली आणि सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. आपल्या स्टाईलबाबत फारच चोखंदळ असल्याचे पाहायला मिळतेय. उर्वशी तिच्या स्टाईल आणि हटके फॅशनसाठी ओळखली जाते.
अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या आपल्या फॅशन आणि महागड्या स्टाईल स्टेटमेंटमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. उर्वशी रौतेलाने फिल्मफेरेच्या रेड कार्पेटवर ३५ लाखांचा मरून ड्रेस घालून हजेरी लावली होती. यात ती फारच सुंदर दिसत होती. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
उर्वशी रौतेला आपली फॅशन आणि स्टाईलबाबत बरीच सजग आहे. ती कुठल्याही कार्यक्रमात जाते तिथे आपल्या हटके फॅशन आणि स्टाईलने साऱ्यांच्याच नजरा आकर्षित करून घेते. रिल लाईफ असो किंवा रिअल उर्वशीच्या स्टाईलवर सारेच फिदा असतात.