Join us  

उर्वशी रौतेलाची ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा २'मध्ये वर्णी?, फोटोमुळे चर्चेला आलं उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 2:57 PM

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये उर्वशी कांतारा अभिनेता-दिग्दर्शक-लेखक ऋषभ शेट्टीसोबत दिसत आहे.

बॉलिवूडमधील सर्व स्टार्स सध्या साऊथच्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहेत. बॉलिवूडचे हिरो तर तिथे जाऊन खलनायक बनायला तयार आहेत. तर नायिका दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या आवडत्या हिरो आणि दिग्दर्शकांसोबत काम करायला तयार आहेत. अशा परिस्थितीत दहा वर्षांपूर्वी सिंग साब द ग्रेट या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री उर्वशी रौतेलाला आता साऊथची लॉटरी लागली आहे. बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक उर्वशी रौतेला कन्नड सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा ब्लॉकबस्टर चित्रपट कांतारा पार्ट २मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

उर्वशी रौतेलाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये उर्वशी कांतारा अभिनेता-दिग्दर्शक-लेखक ऋषभ शेट्टीसोबत दिसत आहे. उर्वशी रौतेलाने या फोटोसोबत अधिकृत घोषणा केली नसली तरी, जे काही लिहिले आहे त्यावरून ती कांतारा २ चा भाग बनल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. खरं तर, ऋषभ शेट्टीसोबतच्या फोटोच्या कॅप्शनवर उर्वशीने लिहिले आहे. ऋषभ शेट्टी आणि नम्र फिल्म्सचा कांतारा २ लोड होत आहे. 

उर्वशी रौतेलाच्या या पोस्टवरून स्पष्ट झाले आहे की ती कांतारा २ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. उर्वशीच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, तिला या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी साईन करण्यात आले आहे, मात्र वेळ आल्यावर घोषणा केली जाईल.

उर्वशीच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. अभिनेत्री म्हणून उर्वशी रौतेलासाठी हा मोठा ब्रेक मानला जात आहे. सोशल मीडियावर चाहते उर्वशीचे अभिनंदन करत आहेत. या अभिनेत्रीसाठी २०२३ हे वर्ष खूप छान असणार आहे, असे ते सांगत आहेत. खरं तर, वर्षाच्या सुरुवातीलाच उर्वशीने वॉल्टेअर वीरैया या चित्रपटातील मेगास्टार चिरंजीवीसोबत बॉस पार्टी या पार्टी अँथम गाण्यात आयटम डान्स करून साऊथच्या प्रेक्षकांची मने जिंकली होती. खुद्द ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी हे उर्वशीवर खूप प्रभावित झाले होते. उर्वशीने नुकताच तेलुगू अभिनेता राम पोथिनेनीसोबत एक चित्रपटही साइन केला आहे. यावर्षी उर्वशी रणदीप हुडाच्या सहकलाकाराच्या भूमिकेत इन्स्पेक्टर अविनाश या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. यापूर्वी हॉलिवूड अभिनेते मिशेल मोरोन आणि जेसन डेरुलो यांच्यासोबत एका अमेरिकन चित्रपटासाठी करार करण्यात आल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :उर्वशी रौतेला