Join us

यूजरने विचारले, तुमच्यासाठी पैसाच सर्वकाही आहे काय?, महानायकांनी दिले ‘हे’ उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 1:56 PM

बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असून, स्वत:च ते त्यांचे सर्व अकाउंट आॅपरेट करतात. याचा उलगडा स्वत: ...

बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असून, स्वत:च ते त्यांचे सर्व अकाउंट आॅपरेट करतात. याचा उलगडा स्वत: महानायकांनीच काही दिवसांपूर्वी केला होता. सध्या अमिताभ ट्विटवरील त्यांच्या एका चाहत्याच्या प्रश्नामुळे चांगलेच अस्वस्थ झाल्याचे दिसून आले. त्यांनी चाहत्याच्या या प्रश्नाला अतिशय संवेदनशील उत्तर दिले. यूजरने विचारले होते की, ‘तुमच्यासाठी पैसाच सर्वकाही आहे काय?’ याचे उत्तर देताना अमिताभ यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘माझ्या फेसबुक पेजवर रोहित बोराडे नावाच्या एका सज्जनने लिहिले, मुंबईमध्ये राहूनही तुम्ही कधीच कुठल्या दुर्घटनेवर ट्विट केले नाही. ना फेसबुक पोस्ट केली. तसेच कधी संवेदनाही व्यक्त केल्या नाहीत. पैसाच सर्वकाही नसतो. मी नेहमी तुमचा चाहता राहणार.’बिग बीने त्याच्या या चाहत्याला ट्विटर अकाउंटवरून उत्तर दिले. त्यांनी लिहिले की, ‘अगदी बरोबर बोलले तुम्ही... नाही करत मी हे सर्वकाही... कारण याठिकाणी केवळ संवेदनेचा प्रचार होईल... खºया संवेदना नाहीत... कारण लोकांसाठी संवेदना केवळ दिखावा आहेत... तुम्हीच मला सांगा अशा दुर्घटनेसाठी तुम्ही काय करू शकता? जेव्हा काही करायचे असते तेव्हा मी ते करीत असतो... असे करताना मी तुम्हाला किंवा अन्य कोणाला हे सांगणार नाही, कारण तो प्रचार होईल, संवेदना नाही... पैशासोबत अशा दुर्घटना किंवा आपल्या विचारधारेला जोडून तुम्ही स्वत: तुमच्यातील कमजोरी दाखवून देत आहात. यावर तुम्ही बाबूजींची ‘क्या करू सामवेदना लेकर तुम्हारी क्या करू!’ ही कविता वाचा.  बिग बीचे हे उत्तर वाचून अनेक यूजर्सने त्यांचे कौतुक केले. बºयाचशा यूजर्सनी लिहिले की, तुम्ही खºया अर्थाने संवेदनशील आहात. एका यूजरने लिहिले की, ‘ज्याच्या मनात खरा भाव आहे, त्याचे प्रत्येक काम चांगले होत असते’, तर दुसºया एका यूजरने लिहिले की, ‘अगदी बरोबर आहे सर, जास्त संवेदना दाखविणारे लोक ढोंगी असतात.