Join us

'या' चित्रपटाचा ट्रेलर पाहून आठवेल श्रद्धा वालकर हत्याकांड, थरारक दृश्य पाहून येईल अंगावर काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 18:37 IST

अभिनेते संजय मिश्रा आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांचा आगामी सिनेमा 'वध' चे ट्रेलर बघून अंगावर काटा येतो. इतकेच नाही तर ट्रेलरमधील सीन्स बघुन सध्याच्या चर्चेत असणाऱ्या श्रद्धा हत्याकांडाची आठवण येईल.

अभिनेते संजय मिश्रा आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांचा आगामी सिनेमा 'वध' चे ट्रेलर बघून अंगावर काटा येतो. इतकेच नाही तर ट्रेलरमधील सीन्स बघुन सध्याच्या चर्चेत असणाऱ्या श्रद्धा हत्याकांडाची आठवण येईल. संजय मिश्रा हे अप्रतिम अभिनेते आहेतच मात्र पहिल्यांदाच ते अशी थ्रिलर भुमिका साकारताना दिसणार आहेत. 'वध' चा हा ट्रेलर २ मिनिट ४१ सेकंदाचा आहे आणि पुर्णवेळ खिळवुन ठेवणारा आहे. यामध्ये संजय मिश्रा आणि नीना गुप्ता हे दोघेही दिग्गज कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. 

ट्रेलरमध्ये संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी दर्शकांना धक्काच दिला आहे. यामध्ये दोघेही मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत, साधे आहेत मात्र यांच्या हातुन एक भयानक अपराध होतो ज्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल. हा अपराध म्हणजे हत्या आहे आणि या हत्येचे दृश्य फारच थरारक आहेत. ते बघुन तुम्हाला नक्कीच श्रद्धा वालकर हत्याकांड आठवेल. 

संजय मिश्रा म्हणतात, 'एक अभिनेता म्हणून माझ्याकडे अशा चित्रपटाची ऑफर येईल आणि तेही नीनाजींसोबत याचा मी विचारही केला नव्हता. आता हे बघायचे आहे की प्रेक्षक सिनेमाला किती प्रतिसाद देतात.'

तर नीना गुप्ता यांनी चित्रपटाविषयी सांगितले, 'वध ही एक थ्रिलर गोष्ट आहे आणि मी या चित्रपटादरम्यान खूप छान वेळ घालवला. ही कहाणी जशी दिसतेय त्यापेक्षा खुपच इंटरेस्टिंग आहे. प्रेक्षकांना चित्रपट नक्की आवडेल.'

'वध' ची कहाणी राजीव बरनवाल आणि जसपाल सिंह सिंधू यांनी लिहिली आणि दिग्दर्शित केली आहे. तर लव रंजन यांची ही प्रस्तुती आहे. वध ९ डिसेंबर ला प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :श्रद्धा वालकरनीना गुप्तासंजय मिश्राहिंदीयु ट्यूब