अभिनेत्री सारा अली खाननेकार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर त्या दोघांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली. नुकतेच मुंबईत फिल्मफेयर पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी कार्तिकला हग डेच्या निमित्ताने विचारले की तुला कोणत्या अभिनेत्रीला गळेभेट घ्यायला आवडेल. त्यावर कार्तिकने सर्व अभिनेत्रींना असे सांगितले. मात्र कोणत्या तरी एका अभिनेत्रीचे नाव घ्यायला सांगितले. तेव्हा कार्तिकने सारा अली खानचे नाव घेतले.
कार्तिकला व्हॅलेंटाइन डेच्या प्लानबद्दल विचारले असता तो म्हणाला की, मी सिंगल आहे. त्यामुळे व्हॅलेंटाइन डेला कोणत्या तरी पार्टीला किंवा घरी असेन. नुकतेच कार्तिकने कॉफी विद करण शोमध्ये कार्तिकने सांगितले की साराला डेटवर नेण्यासाठी तो पैसे जमवतो आहे.