Join us

'व्हॅलेंटाईन वीक'मध्ये मनोरंजनाची पर्वणी; पुन्हा रिलीज होणार इमरान हाश्मीचे 'हे' गाजलेले चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 14:08 IST

इमरान हाश्मीचे 'हे' गाजलेले चित्रपट पुन्हा होणार रिलीज; गाणी आजही आहेत लोकप्रिय

Emraan Hashmi Movie : सध्या व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने जुने रोमॅन्टिक चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरु करण्यात आला आहे. या नव्या ट्रेंडला सिनेरसिकांचा सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अलिकडेच साधारण ९ वर्षांपूर्वी फ्लॉप झालेला सनम तेरी कसम सिनेमा पुन: प्रदर्शित करण्यात आला. आता रि-रीलिज झाल्यानंतर 'सनम तेरी कसम' सिनेमा बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. परंतु आता त्यानंतर आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर रोमॅन्टिक चित्रपटांचा ट्रेंड पाहता अभिनेता इमरान हाश्मीचे (Emraan Hashmi) दोन रोमॅन्टिक चित्रपट पुन्हा प्रदर्शित केले जाण्याची शक्यता आहे.

इमरान हाश्मीच्या कारकिर्दीतील दोन सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणजेच 'आवारापन' आणि 'जन्नत' या चित्रपटांच्या री-रिलीजची सध्या चर्चा होताना दिसतेय. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, प्रेक्षकांच्या आग्रहास्तव इमरान हाश्मीचे हे दोन चित्रपट लवकरच थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहेत. 

दरम्यान इमरान हाश्मीच्या या चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर 'आवारापन' हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. परंतु बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही. मोहित सूरी दिग्दर्शित या सिनेमात साउथ अभिनेत्री श्रिया सरण इमरान हाशमीसोबत मुख्य भूमिकेत होती.

'जन्नत' सिनेमा पुन्हा प्रदर्शित होणार?

कुणाल देशमुख दिग्दर्शित जन्नत हा चित्रपट त्यावेळी प्रचंड गाजला. या रोमॅन्टिक चित्रपटाची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. 2008 मध्ये 'जन्नत' हा सिनेमा रिलीज झाला होता, जो सुपरहिट ठरला. इमरान हाश्मी आणि अभिनेत्री सोनल चौहान या दोघांची लव्हस्टोरी प्रेक्षकांना खूप आवडली होती. पि सध्या हा सिनेमा देखील पुन्हा प्रदर्शित केला जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. 

टॅग्स :इमरान हाश्मीबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा