Join us

Valentine 2025: व्हॅलेंटाईन वीकमध्ये 'हे' ५ चित्रपट प्रदर्शित होणार, जोडीदारासोबत नक्की पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:47 IST

Valentine निमित्त प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांबद्दल जाणून घ्या.

Valentine Day 2025:  फेब्रुवारी महिना प्रेमात अडकलेल्यासाठी प्रचंड खास असतो. एवढंच नाही तर, फेब्रुवारी महिना म्हणजे फक्त प्रेम करण्याचा महिना म्हणून देखील ओळखला जातो. फेब्रुवारी महिन्यात आपण आपल्या खास व्यक्तीवर असलेलं प्रेम व्यक्त करतो. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी असा प्रेमाचा आठवडा  (Valentine Week 2025) साजरा केला जातो. कोणी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला गुलाब किंवा रिंग देऊन प्रपोज करतात, तर कोणी पत्नी किंवा नवऱ्यासाठी कॅन्डल लाईट डिनरचा बेत करतं. जर तुम्हाला हा प्रेमचा आठवडा तुमच्या पार्टनरसोबत साजरा करायचा असेल तर तुम्ही काही रोमँटिक चित्रपट पाहू शकता. पुढील महिन्यात Valentine निमित्त प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांबद्दल जाणून घ्या.

लवयापा (Loveyapa) : अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर यांचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'लवयापा' 7 फेब्रुवारी रोजी  प्रदर्शित होणार आहे. 'लवयापा' हा 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट 'लव्ह टुडे'चा हिंदी रिमेक आहे.

धूम धाम (Dhoom Dhaam):  यामी गौतम आणि प्रतीक गांधीचा (Pratik Gandhi)  'धूम धाम' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात येणार आहे. या रोमकॉम चित्रपटातील यामी आणि प्रतीक गांधीची केमिस्ट्री प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.  हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे रोजी प्रदर्शित होणार आहे. 

छावा (Chhaava) : विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'छावा'  हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.  'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलंय. 

बैडएस रवि कुमार (Badass Ravi Kumar) : गायक अभिनेता हिमेश रेशमिया Badass Ravi Kumar या चित्रपटात थेट मुख्य नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अनेक बडे कलाकार आहेत. येत्या 7 फ्रेब्रुवारी रोजी हा चित्रपट संपूर्ण देशभरात प्रर्शित होणार आहे. 

नखरेवाली (Nakhrewali) : 'नखरेवाली' हा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या चित्रपटात नीता सतनानी आणि अंश दुग्गल हे पाहायला मिळतील. 'नखरेवाली' चित्रपटाचे निर्माते आनंद एल राय आहेत, ज्यांनी 'तनु वेड्स मनू'चे दिग्दर्शन केलं होतं.

 

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटीबॉलिवूडव्हॅलेंटाईन वीकव्हॅलेंटाईन्स डे