Join us

​ Valentine week Special : पाहा, बॉलिवूडचे पाच ‘मोस्ट’ रोमॅन्टिक सीन्स!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2017 12:22 PM

व्हॅलेन्टाईन वीक सुरु झालाय. सगळं वातावरण रोमॅन्टिक झालाय. अशा रोमॅन्टिक वातावरणात बॉलिवूड सिनेमातील टॉप रोमॅन्टिक सीन्स हटकून आठवणारच. अनेक वर्षे जुने असूनही आजही हे रोमॅन्टिक सीन्स तरूणाईच्या मनाला भावतात, याचे कारण म्हणजे, यातील शुद्ध देसी रोमान्स. तेव्हा तुम्हीही बघा तर बॉलिवूडचे पाच मोस्ट रोमॅन्टिक सीन्स...

व्हॅलेन्टाईन वीक सुरु झालाय. सगळं वातावरण रोमॅन्टिक झालाय. अशा रोमॅन्टिक वातावरणात बॉलिवूड सिनेमातील टॉप रोमॅन्टिक सीन्स हटकून आठवणारच. अनेक वर्षे जुने असूनही आजही हे रोमॅन्टिक सीन्स तरूणाईच्या मनाला भावतात, याचे कारण म्हणजे, यातील शुद्ध देसी रोमान्स. तेव्हा तुम्हीही बघा तर बॉलिवूडचे पाच मोस्ट रोमॅन्टिक सीन्स...दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे(१९९५)रोमान्सची चर्चा सुरु आहे आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ आठवणार नाही, असे होऊच शकत नाही. दोन दशकानंतरही या चित्रपटाची प्रेक्षकांवरील जादू कायम आहे. राज आणि सिमरन यांचे प्रेम, त्यांचा हळुवार रोमान्स आजही सगळ्यांच्या मनात जिवंत आहे. या चित्रपटात बरेच रोमॅन्टिक सीन्स आहेत. पण शेवटचा सीन्स बघण्यासारखा आहे. सर्व जगाला मागे सोडत सिमरन आपल्या प्रेमासाठी पळत सुटते, हा सीन सगळ्यांच्या हृदयाला पाझर फोडणारा आहे.कुछ कुछ होता है (१९९८)‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट १९९८ साली आला आणि या चित्रपटाने तरूणाईला वेड लावले. राहुल आणि अंजली या जिगरी दोस्तांची ही प्रेमकथा सगळ्यांनाच भावली. राहुल व अंजली एकमेकांवर प्रेम करतात. पण एकमेकांना सांगू शकत नाहीत. एका सीनमध्ये मात्र न बोलताच दोघेही एकमेकांना आपल्या मनातल्या सगळ्या भावना सांगून जातात. शाहरूख व काजोल यांच्यावर चित्रीत यादगार रोमॅन्टिक सीन्सपैकी हा एक सीन आहे.हम दिल दे चुके सनम(१९९९)सलमान खान व ऐश्वर्या राय यांचे ब्रेकअप म्हणजे एक गाजलेले ब्रेकअप. आज दोघांचेही ब्रेकअप झालेले असले तरी नंदिनी आणि समीर या दोघांच्या भूमिकेत हे दोघेही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहेत. ‘हम दिल दे चुके सनम’चा हा सीनही या चित्रपटाइतकाच रोमॅन्टिक आहे. समीर नंदिनीवर नाराज असतो. पण नंदिनी आपल्या पे्रमळ शब्दांनी त्याची नाराजी दूर करते. यात नंदिनी व समीर या दोघांमधील केमिस्ट्री बघण्यासारखी आहे.दिल चाहता है(२००१)‘दिल चाहता है’चा शेवटचा सीन्स कुठलीच रोमॅन्टिक व्यक्ती विसरू शकत नाही.  असल सगळ्यांसमोर शालिनीला प्रपोज करतो आणि शालिनी कायमची त्याची होते, हा सीन्स प्रत्येक रोमॅन्टिक व्यक्तिने पाहायलाच हवा. आमिर खान आणि प्रिती झिंटा या दोघांची आॅनस्क्रीन केमिस्ट्री यात दिसते आहे.ये जवानी है दिवानी(२०१३)प्रेम माणसाला कुठल्या मर्यादेपर्यंत बदलू शकते? ‘ये जवानी है दिवानी’ हा चित्रपट याचे मोठे उदाहरण आहे. प्रेमापासून, कुटुंबापासून आणि आपल्या जबाबदाºयांपासून दूर पळू पाहणारा बनी नैनाच्या प्रेमात पडतो आणि त्याचे आयुष्यच बदलून जाते. यातील रणबीर कपूर व दीपिकाचा जबरदस्त रोमॅन्टिक अंदाज तुम्हाला पाहायलाच हवा.