Join us

Valentine's Day Special : बॉलिवूडच्या अनोख्या प्रेमकथा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 6:00 AM

बॉलिवूडच्या अनेक नात्यांत काळाबरोबर दुरावा आला, मतभेद आलेत. पण या नात्यातील प्रेम शेवटपर्यंत कायम राहिले. आज व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी अशाच काही जोड्यांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

नव्या वर्षाच्या फेबु्रवारी महिना उगवला रे उगवला की, तरूणाईला वेध लागतात, ते व्हॅलेन्टाईन डे अर्थात १४ फेबु्रवारी या तारखेचे. प्रेमासारखी सुकूमार भावना व्यक्त करण्याचा हा दिवस. प्रेम या भावनेवर अनेक कविता रचल्या गेल्यात, कथा लिहिल्या गेल्यात, पडद्यावर प्रेम भावनेचे दर्शन घडले. या प्रेमाने काही आदर्शही घडवले. अगदी बॉलिवूडही त्याला अपवाद नाही. बॉलिवूडच्या अनेक नात्यांत काळाबरोबर दुरावा आला, मतभेद आलेत. पण या नात्यातील प्रेम शेवटपर्यंत कायम राहिले. आज व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी अशाच काही जोड्यांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

डिंपल- राजेश खन्ना

केवळ वयाच्या सोळाव्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री डिंपल कपाडिया एका अवचित क्षणी सुपरस्टार राजेश खन्नाच्या प्रेमात पडली आणि कोवळ्या वयात त्याच्यासोबत लग्न करून मोकळी झाली. डिंपल व राजेश खन्ना यांच्या संसारवेलीवर टिष्ट्वंकल व रिंकी नावाची दोन फुलेही फुलली. पण लग्नाच्या दहा वर्षांनंतर एकवेळ अशीही आली की, राजेश खन्ना व डिंपल यांना एका छताखाली राहणेही कठीण झाले. अखेर दोघेही वेगळे झालेत. पण ना दोघांनी घटस्फोट घेतला, ना दोघांनी दुसºया लग्नाचा विचार केला. राजेश खन्नाच्या अंतिम श्वासापर्यंत डिंपलने त्याला साथ दिली.

रणधीर कपूर- बबीता

शो मॅन राज कपूर यांचा मोठा मुलगा रणधीर कपूरने अभिनेत्री बबीतासोबत लग्नगाठ बांधली. यशाच्या शिखरावर असताना दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. हा निर्णय अमलातही आणला. पण यानंतर ८-९ वर्षांतचं दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. बबीता करिश्मा व करिना या आपल्या दोन मुलींना घेऊन वेगळी झाली. पण ना बबीताने दुसरे लग्न केले, ना रणधीर कपूर यांनी.

राखी- गुलजार

बॉलिवूडची एकेकाळची गाजलेली अभिनेत्री राखी गीतकार गुलजार यांच्या दुसरी पत्नी. अपार प्रतिभेचे धनी असलेले हे दोघे एकत्र आले. लग्न केले. दोघांना एक मुलगीही झाली. पण मुलीच्या जन्मानंतर वर्षभरातचं राखी व गुलजार एकमेकांपासून विभक्त झाले. याऊपर दोघांनी एकमेकांना घटस्फोट दिला नाही. आजही गुलजार यांचे यश पाहून राखीच्या चेह-यावर वेगळा आनंद पसरतो तर गुलजार यांच्या कवितेत आजही राखी डोकावते.

कमल हासन- सारिका

साऊथ सुपरस्टार कमल हासन व सारिका यांची लव्हस्टोरी अशी. मुलगी श्रुती हिच्या जन्मानंतर कमल व सारिका यांनी लग्न केले. पण लग्नाच्या अनेक वर्षानंतर एका वळणावर विभक्त झालेत. कमल व सारिका यांच्यात कायदेशीर घटस्फोट झाला की नाही, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

झीनत अमान- मजहर खान

एकेकाळी सेक्स बॉम्ब म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री झीनत अमान हिने अभिनेता मजहर खानसोबत लग्न केले. लग्नानंतर मजहर ड्रग्स घेतो, हे झीनतला कळले. मजहर नशेत झीनतला मारहाण करायला. अखेर त्याच्या छळाला कंटाळून झीनत आपल्या मुलांसोबत आईकडे परतली. पण तिने मजहरला सोडले नाही. त्याच्या अंतिम क्षणीही झीनत त्याच्या सोबत होती.

टॅग्स :व्हॅलेंटाईन्स डेबॉलिवूडराजेश खन्नाराखीकमल हासन