Join us

विराट-अनुष्काचा हात धरुन चालताना दिसली 'वामिका', न्यूयॉर्कमधून व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 13:58 IST

विराट अनुष्काची लेक 'वामिका' आता तीन वर्षांची झाली आहे.

सध्या न्यूयॉर्कमध्ये टी 20 विश्वकप सुरु आहे. खेळाडूंचे न्यूयॉर्कमधील व्हिडिओ समोर येत आहेत. त्यात किंग कोहली (Virat Kohli) आणि पत्नी अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये दोघंही छोट्या वामिकाचा (Vamika Kohli)  हात धरुन चालताना दिसत आहेत. यात वामिकाच्या क्यूट वॉकने चाहत्यांना खूश केलंय. बरे दिवसांनी वामिकाची झलक दिसल्याने हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.

विराट अनुष्काची लेक वामिका यावर्षी जानेवारी महिन्यात 3 वर्षांची झाली. सध्या कपल मुलांसह न्यूयॉर्कमध्ये आहे. नुकत्याच व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये विराट आणि अनुष्काने वामिकाचा हात पकडून चालताना दिसत आहेत. न्यूयॉर्कच्या हॉटेलमधील हा व्हिडिओ आहे. एका चाहत्याने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले, 'काही दिवसांपूर्वी विरुष्का आणि वामिका टीम हॉटेलमध्ये दिसले'.

वामिकाच्या क्युट वॉककडे सर्वांचंच लक्ष गेलं. 'वामिकाss किती क्यूट' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 'ही किती मोठी झाली' अशीही कमेंट दुसऱ्या युजरने केली आहे. वामिकाला पाहून चाहते भलतेच खूश झालेत.

अनुष्काने याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात 'अकाय'ला जन्म दिला. लंडनमध्येच तिची डिलीव्हरी झाली. विराटने कुटुंबासोबत भरपूर वेळ घालवला आणि नंतर तो IPL साठी भारतात परतला. तर काही दिवसांनी अनुष्काही भारतात आली. मात्र अद्याप तिने दोन्ही मुलांची झलकही माध्यमांना दाखवलेली नाही. याआधी वामिकाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. 

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीबॉलिवूडसोशल मीडियापरिवारअमेरिकाट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024