वाणी कपूरचा ऐनवेळी नकार; दिग्दर्शकाची ‘बत्ती गुल’!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2018 9:13 AM
‘टॉयलेट एक प्रेमकथा’ दिग्दर्शित केल्यानंतर नारायण सिंग सध्या एका आगळे- वेगळे टायटल असलेल्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे नाव ...
‘टॉयलेट एक प्रेमकथा’ दिग्दर्शित केल्यानंतर नारायण सिंग सध्या एका आगळे- वेगळे टायटल असलेल्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे नाव काय तर ‘बत्ती गुल, मीटर चालू’. याच चित्रपटाच्या हिरोईनने नारायण सिंग यांना मोठा धक्का दिल्याची खबर आहे. होय, या चित्रपटात शाहिद कपूरच्या अपोझिट वाणी कपूरची वर्णी लागली होती. ‘शुद्ध देसी रोमान्स’नंतर वाणी ‘बेफिक्रे’मध्ये दिसली होती. ‘बेफिक्रे’नंतर वाणीला ‘बत्ती गुल, मीटर चालू’ मिळाला होता. चित्रपटाचे कामही सुरु झाले होते. पण वाणीने म्हणे अचानक या चित्रपटासाठी नकार दिलायं. तूर्तास वाणीच्या या नकारामागचे कारण कळू शकले नाही. पण वाणी गेल्याने दिग्दर्शकाची ऐनवेळी पंचाईत झाली. कारण वाणी गेल्यामुळे तिच्याजागी नवी हिरोईन शोधणे आलेच. अर्थात यासाठी नारायण सिंग यांना फार कष्ट घ्यावे लागले नाहीत. कारण वाणीने सोडताच श्रद्धा कपूरने या चित्रपटासाठी होकार दिला. श्रद्धाने शाहिद कपूरसोबत ‘हैदर’मध्ये काम केले होते. या दोघांची पडद्यावरची केमिस्ट्री लोकांनाही आवडली होती. आता श्रद्धा व शाहिदची ही आॅनस्क्रीन केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सुरुवातीला या चित्रपटासाठी कॅटरिना कैफशी संपर्क साधण्यात आला होता. पण ती बिझी असल्याने वाणी कपूरला या चित्रपटासाठी अॅप्रोच केले गेले होते.ALSO READ : वाणी कपूरच्या ‘या’ नव्या गाण्याला ऐकायला लता मंगेशकर यांनी दिला नकार! वाचा, काय आहे कारण!येत्या १९ जानेवारीला ‘बत्ती गुल, मीटर चालू’चे शूटींग सुरु होणार आहे. हा चित्रपट वीज ग्राहकांशी संबंधित मुद्यावर बेतलेला असल्याचे कळते. वीज कंपनीच्या पायºया झिजवणाºया सामान्य माणसाची कथा यात दिसणार असल्याचे कळते. शाहिदची पत्नी मीरा कपूर हिला या चित्रपटाची कथा भलतीच आवडली होती आणि तिनेच या चित्रपटासाठी शाहिदला राजी केल्याचे मानले जाते. या चित्रपटात अभिषेक बच्चनही लहानशा भूमिकेत दिसणार असल्याची खबर आहे. या चित्रपटात अभिनेत्रीची भूमिकाही शाहिद कपूरच्याच तोडीची असल्याचे कळतेय. चित्रपटातील अभिनेत्रीला एका खास पद्धतीच्या एक्सेंटमध्ये बोलावे लागणार आहे.