Photos: वरुण धवनचा लूक पाहून येईल अंगावर काटा; 'भेडियाँ'चा फर्स्ट लूक रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 02:01 PM2021-11-25T14:01:27+5:302021-11-25T14:02:03+5:30

Bhediya: 'भेडियाँ' या चित्रपटाचं चित्रीकरण अरुणाचल प्रदेशमधील एका जंगलात होत आहे. हा चित्रपट नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

varun dhawan and kriti sanon horror comedy film bhediya first look out | Photos: वरुण धवनचा लूक पाहून येईल अंगावर काटा; 'भेडियाँ'चा फर्स्ट लूक रिलीज

Photos: वरुण धवनचा लूक पाहून येईल अंगावर काटा; 'भेडियाँ'चा फर्स्ट लूक रिलीज

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन  (varun dhawan) आणि क्रिती सेनॉन (kriti sanon) यांचा बहुप्रतिक्षीत ठरत असलेल्या 'भेडियाँ' (bhediya) या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. हा चित्रपट २५ नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यापूर्वी त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र, प्रदर्शित झालेल्या पोस्टरवर वरुणचा लूक पाहून आता प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. वरुणने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. 

प्रदर्शित झालेल्या पोस्टरमधून या चित्रपटातील वरुणचा लूक रिव्हिल करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये वरुण अत्यंत वेगळ्या लूकमध्ये दिसत असून त्याला पाहिल्यावर अंगावर काटा येतो. यात वरुणचे डोळे एका भेडियाप्रमाणेच असल्याचं पाहायला मिळत आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार, भेडियाँ हा चित्रपट हॉरर-कॉमेडी प्रकारात मोडणारा असून यात वरुण मिलिट्री ऑफिसर खेत्रपाल  ही भूमिका साकारत आहे. 

'भेडियाँ' या चित्रपटाचं चित्रीकरण अरुणाचल प्रदेशमधील एका जंगलात होत आहे. हा चित्रपट नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात VFX चा वापर करण्यात आला आहे.

दरम्यान, या चित्रपटात वरुण धवन व्यतिरिक्त क्रिती सेनॉन, अभिषेक बॅनर्जी, दीपक हे कलाकार स्क्रीन शेअर करणार आहेत. दिलवाले आणि कलंकनंतर क्रिती आणि वरुण तिसऱ्यांदा पुन्हा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.
 

Web Title: varun dhawan and kriti sanon horror comedy film bhediya first look out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.