Join us

वरूण धवन-श्रद्धा कपूर 'रुल ब्रेकर्स' नाहीत तर आहेत 'स्ट्रीट डान्सर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 20:28 IST

वरूण धवन-श्रद्धा कपूर स्टारर रेमो डिसूजाच्या डान्सवर आधारीत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

ठळक मुद्देस्ट्रीट डान्सर हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी थ्रीडीमध्ये होणार प्रदर्शित

वरूण धवन-श्रद्धा कपूर स्टारर रेमो डिसूजाच्या डान्सवर आधारीत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रेमोचा हा डान्स बेस्ड चित्रपट एबीसीडी या सुपरहिट फ्रेंचाइजीचा तिसरा भाग आहे. या चित्रपटाचे नाव रुल ब्रेकर्स असे असल्याचे बोलले जात होते. मात्र आता या चित्रपटातील वरूण धवनश्रद्धा कपूरचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. यासोबतच चित्रपटाचे नाव जाहीर करण्यात आले आहे. स्ट्रीट डान्सर असे या चित्रपटाचे नाव आहे. 

रेमोने एका रिअॅलिटी शोदरम्यान या चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हाच या चित्रपटात अभिनेता वरुण धवन मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचेही त्याने सांगितले होते. स्ट्रीट डान्सरमध्ये वरुण एका पंजाबी तरुणाची भूमिका वठविणार असून श्रद्धा एका पाकिस्तानी डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे.

वरुणसोबतच श्रद्धाचीदेखील महत्वाची भूमिका असल्यामुळे ती सध्या प्रचंड मेहनत घेत आहे. प्रशांत शिंदे आणि तानिया यांच्याकडून श्रद्धा नृत्याचे धडे गिरवत आहे. प्रशांत आणि तानियाकडून श्रद्धा वेगवेगळे ५ नृत्यप्रकार शिकत आहे. 

चित्रपटात श्रद्धा कपूर आणि वरूण धवनशिवाय प्रभूदेवा आणि नोरा फतेही यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला काही दिवसांपूर्वीच अमृतसरमध्ये सुरूवात झाली. तथापि एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान वरूणच्या गुडघ्याला दुखापतदेखील झाली होती.

 अमृतसरमधील फर्स्ट शेड्यूलनंतर दुसºया शेड्यूलसाठी चित्रपटाची टीम लंडनला रवाना होणार आहे. या चित्रपटाच्या कथेबद्दल फार माहिती समोर आलेली नाही. पण सूत्रांचे मानाल तर श्रद्धा यात एका पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर वरूण एका पंजाबी तरूणाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात ‘एबीसीडी’मधील ‘बेगुनाह’ हे गाणे रिक्रिएट केले जाणार आहे. स्ट्रीट डान्सर हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी थ्रीडीमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

टॅग्स :श्रद्धा कपूरवरूण धवनरेमो डिसुझा