Join us

Video : हॉलिवूड अभिनेत्रीला भर स्टेजवर उचलून घेतलं, गालावर kiss केलं, वरुण धवनवर नेटकरी भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2023 11:15 AM

ती तुझी बायको नाही तर हॉलिवूड स्टार गिगी हदीद आहे. भारताचं नाव खराब करत आहेत असं म्हणत वरुण धवनवर नेटकरी संतापले आहेत.

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) या इव्हेंटचं मुंबईत दोन दिवस आयोजन करण्यात आलं होतं. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये (Jio World Center) हा कार्यक्रम पार पडला. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसह हॉलिवूडच्याही काही सेलिब्रिटींनी कार्यक्रमात हजेरी लावली. कार्यक्रमाचं नाव 'इंडिया इन फॅशन' असं होतं. दुसऱ्या दिवशी कार्यक्रमात हिंदी फिल्म इंडस्ट्रीने स्टेजवर लोकप्रिय गाण्यांवर परफॉर्म करत धमाल आणली. यावेळी वरुण धवनच्या (Varun Dhawan) एका कृतीने सर्वांनाच आश्चर्य वाटलं.

वरुणने हॉलिवूड सेलिब्रिटी गिगी हदीदला उचलून चक्क किस केलं

परफॉर्मन्स दरम्यान शाहरुख खानने रणवीर सिंह आणि वरुण धवन सोबत 'झूमे जो पठाण' गाण्यावर जबरदस्त डान्स केला. त्यांच्या परफॉर्मन्सकडे सर्वच जण बघतच राहिले. तोच वरुण धवनने मात्र असं काही केलं की सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. वरुणने हॉलिवूड अभिनेत्री गिगी हदीद (Gigi Hadid) हिला स्टेजवर बोलवलं आणि चक्क तिला उचलून घेतलं. इतकंच नाही तर तिला उचलून गोल फिरवलं आणि नंतर गालावर किस (KISS) केलं. तर गिगी हदीदला काही वेळ कळलंच नाही की नेमकं काय घडलं. वरुणने तिला उतरवल्यावर ती लगेच स्टेजखाली पळाली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

नेटकऱ्यांना वरुणचं हे वर्तन अजिबात पटलं नाही. एका युझरने तर लांबलचक कमेंट करत भारतीय अभिनेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. तिने लिहिले, ' हे मी काय पाहतीए त्याने परवानगी न घेताच तिला उचललं? ती तुझी बायको नाही तर गिगी हदीद आहे. जागतिक स्तरावर लाज काढली याने. आणि नंतर तिच्या गालावर किस केलं? अतिशय वाईट. जेव्हा आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी भारतात येतात तेव्हा नेहमीच भारतीय सिनेमातील काही सेलिब्रिटींकडून त्यांना अशी का वागणूक दिली जाते. तरी मला वाटलंच या लोकांनी अजून कसा घाणेरडेपणा केला नाही आणि बघा ते झालंच. तुम्हाला नंतर कधीच त्यांना भेटता येणार नाही हे तुमच्या चेहऱ्यावरच लिहिले होते म्हणून तुम्ही असे वागलात. भारतासाठी अतिशय शरमेची गोष्ट आहे. विश्वासच बसत नाही.'

नीता अंबानी यांच्या या कार्यक्रमात देश विदेशातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. अमेरिकन मॉडेल आणि फॅशन आयकॉन गिगी हदीद हिने आपल्या ग्लॅमरस अवतारात एंट्री घेतली. तिचा लुक बघून सर्वच सरप्राईज होते. तिचा हा पहिलाच भारत दौरा होता.

टॅग्स :वरूण धवनबॉलिवूडहॉलिवूडमुकेश अंबानी